चोरीच्या दुचाकींचा ‘डिलिव्हरी’ मॅन जेरबंद; दुचाकी जप्त

By प्रदीप भाकरे | Updated: January 20, 2023 17:35 IST2023-01-20T17:14:57+5:302023-01-20T17:35:05+5:30

आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

'Delivery' man of stolen bikes jailed; Seized the bike | चोरीच्या दुचाकींचा ‘डिलिव्हरी’ मॅन जेरबंद; दुचाकी जप्त

चोरीच्या दुचाकींचा ‘डिलिव्हरी’ मॅन जेरबंद; दुचाकी जप्त

अमरावती : डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ‘पीडीएमसी’ लगतच्या परिसरासह पंचवटी चौकातून अनेक दुचाकी चोरणाऱ्या चोराच्या साथीदारासही गुन्हे शाखेने २० जानेवारी रोजी अटक केली. त्याच्याकडूनही एक दुचाकी जप्त करण्यात आली. मोहसीन अहमद ऊर्फ हाफीसाहब वल्द जमिल अहेमद (३०, रा. चमननगर, बडनेरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुन्हे शाखेने पीडीएमसी परिसरासह पंचवटी चौकातून दुचाकी चोरणाऱ्या तौसिफ खान वल्द अन्सार खान (१९, रा. बिसमिल्लानगर) याला १९ जानेवारी रोजी अटक केली होती. चौकशीत तौसिफ खान याने चोरीच्या दुचाकी ह्या मोहसीन अहेमद याला विकल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मोहसिन अहमदलाही अटक करून त्याच्याकडून एक दुचाकी जप्त केली. या दोघांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजकिरण येवले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे, जावेद अहमद, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, एजाज शहा, चेतन कराडे, योगेश पवार, जगन्नाथ लुटे यांनी केली.

Web Title: 'Delivery' man of stolen bikes jailed; Seized the bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.