‘डिमांड’ नसताना २९ धारदार तलवारींची ‘डिलिव्हरी’, स्थानिकांसह कंपनी संचालकांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 12:32 PM2022-06-29T12:32:44+5:302022-06-29T12:33:19+5:30
राजापेठ पोलीस ठाण्यालगत असलेल्या लक्ष्मी गणेश कम्युनिकेशन्समध्ये २८ जून रोजी हा प्रकार उघड झाला.
अमरावती : कुणीही मागणी केली नसताना तब्बल २८ धारदार तलवारी अमरावतीला पाठविण्यात आल्या. राजापेठ पोलीस ठाण्यालगत असलेल्या लक्ष्मी गणेश कम्युनिकेशन्समध्ये २८ जून रोजी हा प्रकार उघड झाला.
राजापेठ पोलिसांनी त्या तलवारी जप्त केल्या असून लक्ष्मी गणेश कम्युनिकेशन्सचे मुकेश मालविय व दोन कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्या तलवारीचे पाते सुमारे ३४ इंचीचे आहे.
आपल्या अमेझॉन लिक्विडेशन स्टॉक क्लिअरंस प्रोडक्टस स्टोअरमध्ये मागणी केलेली नसतानाही काही तलवारींचे पार्सल आल्याची माहिती तेथील सुपरवायजरने राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांना देण्यात आली. त्यामुळे ठाकरे लागलीच तेथे पोहोचले. त्यावेळी डिमांड नसताना आलेल्या तलवारींमागील कहाणी स्पष्ट झाली. २५ जूनला दिल्लीहून निघालेल्या त्या तलवारी २६ ला बुरहानपूर व २७ रोजी अमरावतीत पोहोचल्या.