डेल्टा प्लस, ५९४ नमुने तपासणीसाठी दिल्लीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 10:56 AM2021-07-24T10:56:56+5:302021-07-24T10:57:23+5:30

Amravati News सध्या चार जिल्ह्यातील ५९४ नमुने पुणे एनआयव्ही व दिल्ली येथील संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. अद्याप अहवाल अप्राप्त असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

Delta Plus, 594 samples to Delhi for testing | डेल्टा प्लस, ५९४ नमुने तपासणीसाठी दिल्लीला

डेल्टा प्लस, ५९४ नमुने तपासणीसाठी दिल्लीला

Next
ठळक मुद्देखबरदारीचा उपाय, पुणे ‘एनआयव्ही’लाही नमुने

 

गजानन मोहोड

 लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला कारणीभूत राहण्याची शक्यता असलेल्या ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’मुळे विभागाची चिंता वाढली आहे. या विषाणूचा शिरकाव होऊच नये, याकरिता प्रशासनाद्वारे सावधगिरीचे उपाय अवलंबले जात आहेत. सध्या चार जिल्ह्यातील ५९४ नमुने पुणे एनआयव्ही व दिल्ली येथील संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. अद्याप अहवाल अप्राप्त असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

दुसऱ्या लाटेत कोरोनाचे जे म्युटेशन सापडले होते. त्याला ‘डेल्टा व्हेरिएंट’ नाव देण्यात आले होते. आता यामध्ये पुन्हा म्युटेशन होऊन ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट तयार झालेला आहे. दुसऱ्या लाटेत या व्हेरिएंटमुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढल्याने आरोग्य यंत्रणेची दाणादाण उडाली होती. यातून सावरत नाही तोच या नव्या व्हेरिएंटने प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढविली आहे.

राज्यात या व्हेरिएंटच्या रुग्णांची नोंद झालेली आहे. हा विषाणू घातक असल्यामुळे चिंता वाढली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाच्या गाईडलाईननुसार २८ जूनपासून पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आतापर्यंतच्या म्युटेशनमध्ये आढळून आलेलीच लक्षणे डेल्टा ‘प्लस’मध्ये आढळतात. मात्र, संसर्ग झाल्यावर झपाट्याने प्रकृती खालावते डोकेदुखी, घशाला सूज, नाक गळणे, याशिवाय ताप ही प्राथमिक लक्षणे आहेत. राज्यासह लगतच्या मध्य प्रदेशात या विषाणूचे रुग्ण आढळून आल्याने विभागाची चिंता वाढली आहे.

‘आरएनए’ व्हायरसचे म्युटेशन जास्त

कोविड-१९ हा ‘आरएनए’ व्हायरस असल्याने म्युटेट होण्याची शक्यता जास्त आहे. दुसऱ्या लाटेच्या वेळचा डेल्टा व्हेरिएंट म्युटेंट झाल्यानंतर ‘प्लस’ व्हेरिएंट समोर आला आहे. याविषयी येत्या आठवड्यात अधिक संशोधन समोर येणार आहे. या विषाणूची जनुकीय तपासणी सुरू असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

सर्वाधिक २१४ नमुने बुलडाणा जिल्ह्यातील

आरोग्य उपसंचालक कार्यालयाचे माहितीनुसार विभागातील ५९४ नमुने तपासणीसाठी पुणे व दिल्ली पाठविण्यात आलेले आहेत. यामध्ये सर्वाधिक २१४ नमुने बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. याशिवाय अकोला १२०, अमरावती १३० व यवतमाळ जिल्ह्यातील १३० नमुने असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

Web Title: Delta Plus, 594 samples to Delhi for testing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.