बांबू वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 10:17 PM2018-10-07T22:17:59+5:302018-10-07T22:18:16+5:30

बांबूपासून तयार होणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू गरजेच्या असून, बांबू हस्तकला व कला केंद्राच्या माध्यमातून तयार होणाऱ्या वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करतील, असा विश्वास राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केला.

The demand for bamboo items in the international market | बांबू वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी

बांबू वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देडिजिटल उद्घाटन : बांबू हस्तकला व कला केंद्राला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बांबूपासून तयार होणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू गरजेच्या असून, बांबू हस्तकला व कला केंद्राच्या माध्यमातून तयार होणाऱ्या वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करतील, असा विश्वास राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केला.
पुणे विद्यापीठात आयोजित कार्यक्रमातून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील बांबू हस्तकला व कला केंद्राचे डिजिटल उद्घाटनदरम्यान त बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, विशेष अतिथी म्हणून पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीष बापट, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री दिलीप कांबळे, पुणेच्या महापौर मुक्ता टिळक, वन विभाग सचिव विकास खारगे, महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी.एस.के. रेड्डी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू के.पी. विभनाथा उपस्थित होते.
केंद्राचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन केल्यानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले, केवळ पाच महिन्यांच्या कालावधीत तीनही विद्यापीठांनी हे केंद्र उभारले आहेत. यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर व इतर कुलगुरुंनी परिश्रम घेतले आहेत. त्यासाठी राज्यपालांनी त्यांचे कौतुक केले. दरम्यान संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव अजय देशमुख, परीक्षा नियंत्रक हेमंत देशमुख, डी.टी.इंगोले, कार्यकारी अभियंता शशीकांत रोडे, सुलभा पाटील, जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर, विद्यार्थी कौशल्य विभागाचे श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: The demand for bamboo items in the international market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.