नवाथेनगर येथे कॉलनी अंगणवाडीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:11 AM2021-07-26T04:11:12+5:302021-07-26T04:11:12+5:30

अमरावती : येथील नवाथेनगर, विद्याविहार कॉलनीत नव्याने अंगणवाडी निर्माण करावी, अशी मागणी लोकमान्य प्रतिष्ठानच्यावतीने महिलांनी केली आहे. या मागणीचे ...

Demand for Colony Anganwadi at Navathenagar | नवाथेनगर येथे कॉलनी अंगणवाडीची मागणी

नवाथेनगर येथे कॉलनी अंगणवाडीची मागणी

Next

अमरावती : येथील नवाथेनगर, विद्याविहार कॉलनीत नव्याने अंगणवाडी निर्माण करावी, अशी मागणी लोकमान्य प्रतिष्ठानच्यावतीने महिलांनी केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा व महिला बालविकास अधिकाऱ्यांना शक्ती तिडके, श्रीकांत ठोसर, प्रणाली तिडके, प्रियंका चेडे, ममता कडू आदींनी दिले आहे.

------------------

काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा आढावा

फोटो - २५ पी काँग्रेस

अमरावती : शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा आढावा नुकताच घेण्यात आला. यावेळी माजी मंत्री सुनील देशमुख, महापालिकेतील विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, अब्दुल रफीक आदी उपस्थित होते. यावेळी पक्ष बांधणी, नवीन कार्यकारिणी आदींवर चर्चा झाली.

--------------------

महापालिका पशू शल्यचिकित्सक कोरोनायोद्धा सन्मानित

फोटो - २५ पी बोंद्रे

अमरावती : कोरोनाकाळात अतिशय चांगली सेवा बजावल्याबद्दल महापालिकेचे पशू शल्यचिकित्सक सचिन बोंद्रे यांना महापौर चेतन गावंडे यांनी नुकतेच कोरोनायोद्धा म्हणून सन्मानित केले. यावेळी आयुक्त प्रशांत रोडे, शिक्षणाधिकारी राजीक आदी उपस्थित हाेते.

----------------

राज्यस्तरीय ऑनलाईन लाठी स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

फोटो - पी क्रीडा २५

अमरावती : ट्रेडिशनल लाठी स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन लाठी स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. बडनेरा येथील खेळाडूंनी आपल्या खेळाचे सुंदर प्रदर्शन केले. प्रशिक्षक सोनल रंगारी यांच्या हस्ते सरोज मेश्राम, सपना सावंत, सोनम यादव, समीक्षा वासनिक आदी विजेत्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

--------------------

ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयात पदवी वितरण

फोटो - पी २५ बियाणी

अमरावती : ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयात नुकताच पदवी वितरण समारंभ पार पडला. कोरोना नियमांचे पालन करून हा सोहळा पार पडला. सर्व शाखेतील १८०० विद्यार्थ्यांची उपस्थिती आभासी पद्धतीने होती. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अशोक राठी, उच्च शिक्षण सहसंचालक केशव तुपे, प्राचार्य दीपक धोटे उपस्थित होते.

---------------

Web Title: Demand for Colony Anganwadi at Navathenagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.