‘त्या’ विद्यार्थ्याच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 11:26 PM2017-10-03T23:26:57+5:302017-10-03T23:27:09+5:30

नवसारीस्थित महर्षी पब्लिक स्कूलमधील आदिवासी विद्यार्थ्याच्या संशयास्पद मूत्यृ प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी मंगळवारी शिवसेनेने केली आहे.

The demand for a high-level inquiry into the death of the student | ‘त्या’ विद्यार्थ्याच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

‘त्या’ विद्यार्थ्याच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Next
ठळक मुद्देशिवसेना : निवासी उपजिल्हाधिकाºयांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नवसारीस्थित महर्षी पब्लिक स्कूलमधील आदिवासी विद्यार्थ्याच्या संशयास्पद मूत्यृ प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी मंगळवारी शिवसेनेने केली आहे. यासंदर्भात आरडीसी नितीन व्यवहारे यांना निवेदन दिले आहे.
महर्षी पब्लिक स्कुलचा आदिवासी विद्यार्थी रोशन कैलास सावलकर याचा सोमवारी संशयास्पद मूत्यू झाला. शाळा संचालकांच्या हलगर्जीपणामुळेच रोशनला वैद्यकीय उपचार योग्यवेळी मिळाला नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्याला वेळीच उपचार मिळाला असता तर हा दुर्दैवी प्रकार होऊ शकला नसता. आदिवासी विकास विभागाकडून या शाळेला हजारो रूपयांचे अनुदान दिल्यानंतरही विद्यार्थ्यांना पुरेशा सोयी मिळत नाही. अनेक त्रुट्या असताना त्यावर संबंधित विभागाने कारवाई केली नाही. त्यामुळे दोषीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाव्दारे शिवसेनेचे उपशहर प्रमुख आशिष ठाकरे,विजय बेनोडकर, प्रणय डांगे,अविनाश देशमुख, विक्की गृहे,संकेत कावरे, हर्र्षल उके, अभिषेक डामरे, अंकुश जयस्वाल, अक्षय सरोदे, आकाश गाडे, अनिकेत खोडके, पवन गावंडे, आदेश कोंडे आदींनी केली.

Web Title: The demand for a high-level inquiry into the death of the student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.