वैद्यकीय अधिकाऱ्यांची गट ‘अ‘ संवर्गात पदोन्नतीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:17 AM2021-09-16T04:17:54+5:302021-09-16T04:17:54+5:30
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिसूचनेप्रमाणे सावरीकर समिती शिफारशी तथा सर्वोच्च न्यायालयाच्या समान काम, समान वेतन धोरणानुसार मागील सेवेचा ...
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिसूचनेप्रमाणे सावरीकर समिती शिफारशी तथा सर्वोच्च न्यायालयाच्या समान काम, समान वेतन धोरणानुसार मागील सेवेचा कालावधी लक्षात घेता ते बीएएमएस डॉक्टर गट अ संवर्गात पदोन्नतीसाठी पात्र आहेत. पदोन्नती व निवडची संधी असूनही अनेक पद रिक्त असताना २३ वर्षांत एकही गट ब वैद्यकीय अधिकाऱ्याची पदोन्नती केलेली नाही. शासकीय धोरणानुसार गट अ संवर्गाच्या २५ टक्के जागा गट ब संवर्गाकरिता पदोन्नतीसाठी राखीव आहे. मात्र, त्यातही अनुशेष बाकी आहे. शासनाद्वारे गट अ वैद्यकीय अधिकारीपदासाठी जाहिरात काढली जाते. त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. एमबीबीएस डॉक्टर सेवेत रुजू होतात आणि लवकरच सेवा सोडून देतात. अशात १५ वर्षे अविरत सेवा बजावणाऱ्या बीएएमएस वैद्यकीय डॉक्टरांचा अ संवर्गात पदोन्नतीसाठी विचार करण्याची मागणी ना. बच्चू कडू यांच्याकडे त्यांनी केली. यावेळी
महासंघाचे पदाधिकारी डॉ. वैशाली निस्ताने, गोपाल क्षीरसागर, अश्विन जेनईकर, शरद जोगी, सुषमा डोंगरे, जुबेर अली, स्वाती खडसे, गणेश मालखेडे, दीपक देशमुख, अनुपमा खेडकर, जावेद खान, नील दहातोंडे, मुकेश पारडे आदी उपस्थित होते.