रेमेडिसिवरच्या मागणीत ६० टक्क्यांनी घट, साठा पुरेसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:12 AM2020-12-24T04:12:52+5:302020-12-24T04:12:52+5:30

(असाईनमेंट) अमरावती : जिल्ह्यात अलीकडे कोरोना संसर्गाच्या रुग्णात घट झाल्याने गंभीर रुग्ण संख्येतही कमी आलेली आहे. परिणामी अशा रुग्णांसाठी ...

Demand for remedies reduced by 60 per cent, stocks sufficient | रेमेडिसिवरच्या मागणीत ६० टक्क्यांनी घट, साठा पुरेसा

रेमेडिसिवरच्या मागणीत ६० टक्क्यांनी घट, साठा पुरेसा

Next

(असाईनमेंट)

अमरावती : जिल्ह्यात अलीकडे कोरोना संसर्गाच्या रुग्णात घट झाल्याने गंभीर रुग्ण संख्येतही कमी आलेली आहे. परिणामी अशा रुग्णांसाठी लाभदायी असलेल्या रेमेडेसिवर या इंजेक्शनची मागणी आता ७० टक्क्यांपर्यंत कमी झालेली आहे. सद्यस्थितीत १७०० व्हायल उपलब्ध आहे. याशिवाय कोरोना रुग्णांसाठीचा औषधी साठादेखील पुरेसा असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेद्वारा रेमेडेसिवर हे इंजेक्शन फारसे फायद्याचे नसल्याचे मत नोंदविले. मात्र, राज्यात याविषयी आरोग्य विभागाचे कोणतेच निर्देश नसल्याचे या इंजेक्शनचा जिल्ह्यात वापर सुरू आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर या इंजेक्शनची मागणी वाढल्याने काही प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. मात्र, जिल्हा आरोग्य यंत्रणेला शासनाद्वारा औषधांचा पुरवठा होत असल्याने यात कमी आलेली नाही. इंजेक्शन प्रोटोकॉलनुसार वापरात आल्याने याची टंचाई जाणवली नाही. मात्र, खासगीमध्ये या इंजेक्शनची टंचाई होती व वााढीव किमतीत काळ्या बाजारात हे इंजेक्शन विकले गेले. या इंजेक्शनचा वापर व विक्री याविषयीचे रेकाॅर्ड ठेवण्यात आल्याने यावर नियंत्रण मिळविण्यात यश आले. यासाठी अन्न व औषधी प्रशासनाची भुमिकाही महत्त्वाची ठरली आहे.

आता रुग्णसंख्येत कमी आलेली असली तरी रोज ३० चेवर रेमेडिसीवर इंजेक्शनचा वापर कोविड हॉस्पिटलमध्ये होत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १७०० रेमेडिसिवर इंजेक्शन उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले

बॉक्स

रोज ३० इंजेक्शनची गरज

जागतिक आरोग्य संघटनेच्या निरीक्षणानंतर राज्यासह जिल्ह्यात या इंजेक्शनचा वापर सुरु आहे. कोरोनावर औषधच नसल्याच्या पार्श्वभुमीवर रेमेडिसिवरपासून काही प्रमाणात फायदा होत असल्याने याचा वापर जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयात केला जात आहे. सध्या रुग्णसंख्या व गंभीर रुग्णांमध्ये कमी आल्याने रेमेडिसिवरच्या मागणीत कमी आलेली आहे.

सध्या रेमेसिवर इंजेक्शन उपलब्ध १७००

पाईंटर

कोरोनाचे एकूण रुग्ण : १९,१०३

उपचारानंतर बरे झालेले रुग्ण : १८,२९७

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण : ४१३

बॉक्स

अँन्टिजेन टेस्ट, औषधीचा साठा पुरेसा उपलब्ध

* जिल्ह्यात सध्या तालुका, जिल्हा रुग्णालयात याव्यतिरिक्त महापालिकेच्या दोन केंद्रांवर कोरोनाचे नमुने संकलन व रॅपीड अँन्टिजेनच्य टेस्ट केल्या जात आहेत. यासाठी जिल्ह्यात सद्यस्थितीत चार हजार अँन्टिजेन टेस्ट किट उपलब्ध आहेत.

* कोरोना संसर्गाचे उपचारासाठी आवश्यक औषधांचा साठा पुरेसा व सद्यस्थितीत असलेल्या रुग्णसंंख्येच्या प्रमाणात एक महिना पुरेल एवढा असल्याचूी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.

कोट

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांमध्ये अलीकडे कमी आलेली आहे. त्यामुळे रेमेडिसिवरचा वापर कमी झालेला आहे. मात्र आरोग्य विभागाकडे पुरेसा म्हणजे सद्यस्थितीत १७०० इंजेक्शनचा स्टॉक उपलब्ध आहे. याशिवाय रॅपीड अँन्टिजेनच्या ४०० हजार किट उपलब्ध आहेत.

- डॉ श्यामसुंदर निकम,

जिल्हा शल्य चिकित्सक

Web Title: Demand for remedies reduced by 60 per cent, stocks sufficient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.