तीन लाख हेक्टर उद्ध्वस्त २१४.३६ कोटींची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 05:00 AM2020-10-18T05:00:00+5:302020-10-18T05:00:32+5:30
यंदाच्या खरीप हंगामात जून महिन्यात पावसाने हजेरी लावली व उसंत घेतली. त्यानंतर जुलै महिन्यापासून रिपरीप सुरु झाली. ती अजूनही सुरू आहे. या कालावधीत मूग, उडदासह सोयाबीनचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कपाशीची मोठ्या प्रमाणात बोंडगळ झाली. विशेष म्हणजे गुलाबी बोंडअळीचा प्रकोप यंदाही कायम आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा खरिपातील अर्धेअधिक पिकांचे नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पेरणीनंतर सतत पाऊस व ढगाळ वातावरणामुळे कीड,रोगांचा प्रादुर्भाव होवून जून ते सप्टेंबर या कालावधीत २ लाख ९१ हजार ५८४ हेक्टर क्षेत्रामधील खरिपाची पिके व फळपिकांचे ३३ टक्कयांवर नुकसान झालेले आहे. या बाधित क्षेत्राला ह्यएनडीआरएफह्णच्या निकषाप्रमाणे मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी २१४ कोटी ३६ लाख ९२ हजार २५० रुपयांच्या मागणीचा अहवाल शासनाला पाठविला आहे.
यंदाच्या खरीप हंगामात जून महिन्यात पावसाने हजेरी लावली व उसंत घेतली. त्यानंतर जुलै महिन्यापासून रिपरीप सुरु झाली. ती अजूनही सुरू आहे. या कालावधीत मूग, उडदासह सोयाबीनचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कपाशीची मोठ्या प्रमाणात बोंडगळ झाली. विशेष म्हणजे गुलाबी बोंडअळीचा प्रकोप यंदाही कायम आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा खरिपातील अर्धेअधिक पिकांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात सातत्याने तक्रार झाल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संयुक्त सर्वेक्षणासह पंचनाम्याचे आदेश यंत्रणेला दिले. याबाबतचा अहवाल चार दिवसांपूर्वी राज्य शासनाला सादर करण्यात आलेला आहे. ऑक्टोबर महिन्यातील नुकसानीच्या सर्व्हेक्षणाचे आदेशदेखील तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात यंदा १० तालुक्यांनी पावसाची सरासरी पार केलेली आहे. सर्वाधिक पाऊस ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेला आहे. पिकांच्या वाढीच्या व फुलोराच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीने बळीराजाच्या तोंडचा घास हिरावला. त्यापूर्वी उगवणशक्ती नसलेले सोयाबीन कंपन्यांद्वारा शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने २५ हजारांवर हेक्टर क्षेत्रात दुबार पेरणीची वेळ ओढावली होती. त्यामुळे शासन मदतीसह पिकांना विमा भरपाई मिळावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी आहे.
३०२०६० शेतकऱ्यांच्या जिरायत क्षेत्राखालील २७७१७०.३५ हेक्टर क्षेत्रामधील पिकांसाठी १८८,४७,५८,३८० रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे.
३२३ शेतकऱ्यांच्या ११७.६३ हेक्टरमधील बागायत पिकांचे १५,८७,८७० रुपयांचे नुकसान झालेले आहे.
२०२१३ शेतकऱ्यांच्या १४२९७ हेक्टरमधील फळपिकांचे २५,७३,४६,००० रुपयांचे नुकसान झालेले आहे
३२२५९६ शेतकऱ्यांच्या २९१५८४.९७ हेक्टरमधीळ पिकांचे २१४,३६,९२,२५० रुपयांचे नुकसान झालेले आहे.
इतर पिकांचेही नुकसान
यंदाच्या खरीप हंगामात ज्वारी २६२६ हेक्टर, तूर १५७९ हेक्टर, मका १८०८ हेक्टर, धान ३८१८ हेक्टर या पिकांसाठी ६८०० रुपये हेक्टर, यासोबतच केळीचे ११३ हेक्टर, भाजीपाला १.४५ हेक्टर, ऊस २.५५ हेक्टरल १३,५०० रुपये हेक्टर व संत्रा १४,०९७ हेक्टर, मोसंबी १९९ हेक्टरला १८,००० रुपये हेक्टरप्रमाणे अपेक्षित निधीची मागणी शासनाकडे केलेली आहे.