अमरावती-तिवसा एसटी बस सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:13 AM2021-03-25T04:13:53+5:302021-03-25T04:13:53+5:30

---------- २२ वर्षीय विवाहितेचा छळ जरूड : वरूडच्या इस्लामनगर येथील २२ वर्षीय विवाहितेने कोंढाळी येथील सासरी २०१६ पासून छळ ...

Demand to start Amravati-Tivasa ST bus | अमरावती-तिवसा एसटी बस सुरू करण्याची मागणी

अमरावती-तिवसा एसटी बस सुरू करण्याची मागणी

googlenewsNext

----------

२२ वर्षीय विवाहितेचा छळ

जरूड : वरूडच्या इस्लामनगर येथील २२ वर्षीय विवाहितेने कोंढाळी येथील सासरी २०१६ पासून छळ होत असल्याची तक्रार दाखल केली. त्यावरून वरूड पोलिसांनी शे. वसीम अब्दुल सत्तार (३०), अब्दुल सत्तार अब्दुल गफ्फार (६०), शे. सलीम अब्दुल गफ्फार (२५) व दोन महिलांविरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------

घर नावाने करण्यासाठी पित्याला मारहाण

पुसला-राजुरा बाजार : घर नावाने करून देण्याची मागणी करीत शेतात काम करीत असलेल्या पित्याला मुलाने लाकडी काठीने मारहाण केली. याप्रकरणी रामदास जागोजी डबरासे (७०, रा. वॉर्ड २ शहापूर) यांच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी सिद्धार्थ (२८) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३२४, ४२७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.

----------

एरंडवाडी येथून पाणबुडी मोटर लंपास

बेनोडा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एरंडवाडी शिवारातून बारगाव ग्रामपंचायतीच्या मालकीची पाणबुडी मोटर, केबल असा २९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

---------

जंगलातून ट्रॅप कॅमेरे लंपास

धारणी : तारुबांदा वनपरिक्षेत्रातील अढाव वर्तुळात लावलेले दोन ट्रॅप कॅमेरे अज्ञात चोरट्याने लंपास केले. २१ मार्च रोजी ही घटना घडली. वनरक्षक अनिल बारगीर यांनी धारणी पोलीस ठाण्यात याप्रकरणी भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला.

----

खासपूर येथून शेतमाल लंपास

दर्यापूर : तालुक्यातील खासपूर येथील शरद साबळे (४८) यांच्या घरातून चार पोते तूर व चार पोते हरभरा असा ४७ हजारांचा शेतमाल लंपास करण्यात आला. याप्रकरणी त्यांनी राजेश गजानन राठोड (२९) याच्यावर संशय नोंदविला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३८०, ४५७ अन्वये गुन्हा दाखल केला.

-----------

Web Title: Demand to start Amravati-Tivasa ST bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.