पल्लवी सोटे यांच्या निलंबनाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:13 AM2021-04-16T04:13:18+5:302021-04-16T04:13:18+5:30
फोटो - १५ एस तिवसा अग्निशमन वाहन जळीत प्रकरण, तिवस्यातील नगरसेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण तिवसा : नगर परिषदेच्या मुख्याधिकारी ...
फोटो - १५ एस तिवसा
अग्निशमन वाहन जळीत प्रकरण, तिवस्यातील नगरसेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण तिवसा : नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी सोटे यांच्या बेजबादारपणामुळे अग्निशमन वाहन जळून ७५ लक्ष रुपयांचे नुकसान झाले, असा आरोप तिवसा येथील नगरसेवकांनी त्यांच्या निलंबनाची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ एप्रिलपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक भूषण यावले, शिवसेनेचे नगरसेवक तथा उपजिल्हाप्रमुख प्रदीप गौरखेडे, नगरसेवक धनराज थूल व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप शापामोहन यांचे उपोषण सुरू झाले. यादरम्यान उपजिल्हाधिकारी वसंत व्यवहारे यांच्याशी चर्चा करण्यात आली. मुख्याधिकारी पल्लवी सोटे यांचेवर कार्यवाही संदर्भात अहवाल जिल्हाधिकारी व वरीष्ठ अधिकाऱ्याकडे पाठविला आहे. तूर्तास प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदी कलम १४४ घोषित केले. त्याअनुषंगाने उपोषण तात्पुरते स्थगित करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तथापि, कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा आंदोलनकर्ते भूषण यावले, प्रदीप गौरखेडे, धनराज थूल, दिलीप शापामोहन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजय सुरटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष हेमंत बोबडे यांनी सांगितले.