दोन लाखांच्या हुंड्याची मागणी; तोडला विवाह

By Admin | Published: February 26, 2017 12:05 AM2017-02-26T00:05:58+5:302017-02-26T00:05:58+5:30

दोन लाखाच्या हुंड्याची मागणी करून विवाह प्रसंग तोडल्याचा प्रकार शुक्रवारी शेवती जहागिर गावात उघड झाला.

Demand for two lakh rupees; Broken marriage | दोन लाखांच्या हुंड्याची मागणी; तोडला विवाह

दोन लाखांच्या हुंड्याची मागणी; तोडला विवाह

googlenewsNext

वधूपक्षाची तक्रार : वरपक्षाविरुद्ध गुन्हे
अमरावती : दोन लाखाच्या हुंड्याची मागणी करून विवाह प्रसंग तोडल्याचा प्रकार शुक्रवारी शेवती जहागिर गावात उघड झाला. याप्रकरणात नांदगाव पेठ पोलिसांनी वधु पक्षाच्या तक्रारीवरून वर्धा येथील वरपक्षाविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.
पोलीस सुत्रानुसार अतुल पद्माकर हायगुने (२८, गोजी, वर्धा), संजय तुकाराम सायंकर, सुनिल तुकाराम सायंकर (दोन्ही राहणार बोरगाव मेघे) व शंकर सुरकार (रा. एकुर्ली, वर्धा) अशी आरोपींची नावे आहे.
शेवती जहागिर येथील मुलीची पंसती दाखवून वरपक्षाने वर्धा येथे लग्न समारंभ करण्याचे वधुपक्षाला सांगितले होते. त्याकरिता वर पक्षाने वधु पक्षाला २ लाखांची मागणी केली. ती मागणी वधू पक्षाने पुर्ण केल्यानंतर मुलाचा मावसा संजय सायकर यांच्या बँक खात्यात अंगठीसाठी २५ हजार रुपये सुध्दा जमा केले. १९ फेब्रुवारी रोजी सांक्षगंध ठरले होते. त्यानुसार वधु पक्षाने सांक्षगंधाच्या तयारीसाठी ५० हजारांचा खर्च केला.
हुंडा मागणे गुन्हाच
अमरावती : मात्र, तत्पूर्वीच वर पक्षाने फोन करून आणखी २ लाख रुपयांची मागणी केली. इतकी मोठी रक्कम पुन्हा देणे शक्य नसल्यामुळे वधू पक्षाने वर पक्षाला पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी विवाह न करण्याचे वधु पक्षाला कळविले. हुंडा मागणे हे कायद्याने गुन्हा असतानाही वर पक्षाने वधू पक्षाला हुंड्याची मागणी करून लग्न तोडल्याच्या या प्रकारची तक्रार मुलीच्या वडिलाने शुक्रवारी नांदगाव पेठ पोलिसांकडे केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३, ४, हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१ नुसार गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस शिपाई विजय केवतकर करीत आहे.

Web Title: Demand for two lakh rupees; Broken marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.