पंचायत समिती आवारात ‘डेमो हाऊस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:11 AM2021-04-17T04:11:56+5:302021-04-17T04:11:56+5:30
पीएम आवास : महआवास योजनेची अंमलबजावणी वरूड : ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत उभारण्यात ...
पीएम आवास : महआवास योजनेची अंमलबजावणी
वरूड : ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या घरकुलांच्या कामांचा दर्जा उच्च प्रतीचा राहावा तसेच ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थींनी कमी खर्चात घरकुलाचे बांधकाम कसे करावे, याचे प्रात्यक्षिक कळावे, याकरिता प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत पंचायत समिती आवारात डेमो हाऊसचे बांधकाम करण्यात येत आहे.
शासनाने सर्वांसाठी घरे हे धोरण जाहीर केलेले असून, राज्यातील ग्रामीण भागामध्ये बेघर घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण व इतर राज्य पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी महाराष्ट्रात २० नोव्हेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत महाआवास अभियान राबविण्यात येत आहे.
डेमो हाऊसच्या भूमिपूजनप्रसंगी वरूड पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे, उपसभापती चंद्रशेखर अळसपुरे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी, पंचायत समिती सदस्य तुषार निकम, राजू पापडकर, सिंधू करणाके, गिरीजा धुर्वे, शिल्पा पवार, ललिता लांडगे, चैताली ठाकरे, अंजली तुमराम, गटविकास अधिकारी वासुदेव कनाटे, शैलेश ठाकरे, बंडू गोळे, अभिजित अळसपुरे तसेच पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.