भाजपामुळे लोकशाही धोक्यात - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 05:33 AM2018-12-06T05:33:29+5:302018-12-06T05:33:36+5:30

निवडणुकीपूर्वी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा केली.

Democracy in danger due to BJP - Ashok Chavan | भाजपामुळे लोकशाही धोक्यात - अशोक चव्हाण

भाजपामुळे लोकशाही धोक्यात - अशोक चव्हाण

Next

मोर्शी/चांदूर बाजार (अमरावती) : निवडणुकीपूर्वी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा केली. त्याची पूर्तता करण्याऐवजी नोटाबंदी, जीएसटीमुळे महागाईचा डोंगर वाढविला. देशाची लोकशाहीच
आता धोक्यात आली आहे, असे प्रतिपादन काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले. ते मोर्शी येथील गांधी पुतळ्यासमोर आयोजित जनसंघर्ष यात्रेत बोलत होते.
अमरावती जिल्ह्यात मोर्शी, चांदूर बाजार, वलगाव व अमरावती येथे काँग्रेसच्यावतीने जनसंघर्ष यात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारवर घणाघाती हल्ला केला. मोर्शी येथील सभेच्या अध्यक्षस्थानी चारुलता टोकस होत्या. प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव
ठाकरे, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, व्यासपीठावर उपस्थित
होते.

Web Title: Democracy in danger due to BJP - Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.