लोकशाहीविरोधी भूमिकेचा जिल्हा काँग्रेसकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 10:12 PM2018-05-18T22:12:56+5:302018-05-18T22:13:28+5:30

भाजपने कर्नाटक राज्यामध्ये लोकशाहीचा गळा घोटला. बहुमत नसतानाही सत्ता स्थापन करण्यासाठी लोकशाहीचा खून केल्याच्या निषेधार्थ शुक्रवार, १८ मे रोजी इर्विन चौक येथे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाच्यावतीने निदर्शने करण्यात आली. आ. वीरेंद्र जगताप, प्रदेश सचिव संजय खोडके, नितीन गोंडाणे, केवलराम काळे यांची आंदोलनात उपस्थिती होती.

Demonstrate the anti-democracy role from the district Congress | लोकशाहीविरोधी भूमिकेचा जिल्हा काँग्रेसकडून निषेध

लोकशाहीविरोधी भूमिकेचा जिल्हा काँग्रेसकडून निषेध

Next
ठळक मुद्देइर्विन चौकात निदर्शने : राज्यपाल, केंद्र शासनाच्या निर्णयावर रोष

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भाजपने कर्नाटक राज्यामध्ये लोकशाहीचा गळा घोटला. बहुमत नसतानाही सत्ता स्थापन करण्यासाठी लोकशाहीचा खून केल्याच्या निषेधार्थ शुक्रवार, १८ मे रोजी इर्विन चौक येथे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाच्यावतीने निदर्शने करण्यात आली. आ. वीरेंद्र जगताप, प्रदेश सचिव संजय खोडके, नितीन गोंडाणे, केवलराम काळे यांची आंदोलनात उपस्थिती होती.
कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे स्पष्ट बहुमत नाकारून अल्पमतातील भाजपच्या येडियुरप्पांना सरकार स्थापन करण्याच्या राज्यपालांनी केंद्र शासनाच्या दबावाखाली संधी दिली. मेघालय, मणीपूर व गोवा या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळवूनही सत्ता स्थापनेसाठीची संधी नाकारण्यात आली होती. ही बाब असंवैधानिक असून, लोकशाहीच्या आदर्शाला काळिमा फासणारी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी जि.प. सभापती जयंत देशमुख, राहुल येवले, श्रीराम नेहर, प्रल्हाद ठाकरे, सुधाकर भारसाकळे, अनंत साबळे, बंडू देशमुख, बाळासाहेब हिंगणकीर, हरिभाऊ मोहोड, मोहन सिंगवी, अरविंद लंगोटे, भैया पवार, भैयासाहेब मेटकर, प्रवीण वाघमारे, शिवाजी बंड, प्रदीप देशमुख, सुरेश आडे, प्रमोद दाळू, प्रकाश काळबांडे, दयाराम काळे, संजय वानखडे, सुरेश साबळे, सुनील गावंडे, प्रदीप वाघ, बिट्टू मंगरोळे, बापूराव गायकवाड, भागवत खांडे, उषाताई उताणे, अभिजित देवके, सिद्धार्थ बोबडे उपस्थित होते.
एकदिवसीय सांकेतिक धरणे
कर्नाटक राज्यामध्ये सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने लोकशाही पायदळी तुडवली. हा प्रकार लोकशाहीची थट्टा करणारा असल्याने, त्याविरोधात काँग्रेसने ‘लोकशाही वाचवा दिवस’च्या माध्यमातून एकदिवसीय धरणे दिल्याचे बबलू देशमुख म्हणालेत.

Web Title: Demonstrate the anti-democracy role from the district Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.