टाकरखेडा संभु येथे बीबीएफ पेरणीचे प्रात्याक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:10 AM2021-06-23T04:10:25+5:302021-06-23T04:10:25+5:30
जिल्हा कृषी अधीक्षक विजय चव्हाळे यांचे मार्गदर्शन टाकरखेडा संभु : कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभाग थेट ...
जिल्हा कृषी अधीक्षक विजय चव्हाळे यांचे मार्गदर्शन
टाकरखेडा संभु :
कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभाग थेट शेताच्या बांधावर पोहोचले, अशातच टाकरखेडा संभु येथे जिल्हा कृषी अधीक्षक विजय चव्हाळे यांनी शेताच्या बांधावर शेतकऱ्यांना बीबीएफ पेरणी ,बीजप्रक्रिया आदींसह अन्य विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले
कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यामध्ये कृषि संजीवनी मोहीम 2021 राबवली जात आहे या अंतर्गत कृषी विभाग शेताच्या बांधावर पोहचून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे या योजने अंतर्गत भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभु येथे तुषार कांडलकर यांच्या शेतात जिल्हा कृषी अधीक्षक विजय चव्हाळे यांनी शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले ,यावेळी शासनाचा कृषीभूषण पुरस्कार प्राप्त पौर्णिमा सवाई यांची देखील उपस्थिती होती, रुंद वरंबा सरी बाबत तसेच बीजप्रक्रिया, निंबोळी अर्क फायदे, किड व्यवस्थापन, बांधावर फळबाग लागवड इत्यादी बाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच BBF द्वारे पेरणी चे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी गावातील सरपंच रश्मी देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दिलीप म्हसके, प्रीती पाटील, सोनाली जामठे, पोलीस पाटील अजय मोहकर, अजय देशमुख, मंडळ कृषी अधिकारी अशोक जाधव, कृषि पर्यवेक्षक हेमंत इंगळे, कृषि सहायक रूपाली ठाकरे, आशिष तायडे ,अतुल सोळंके, स्वाती तायडे, समूह सहायक सुचिता राजनिरे ,यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
===Photopath===
220621\img-20210622-wa0060.jpg
===Caption===
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा कृषी अधीक्षक विजय चव्हाळे