डेंग्यू : १७ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 10:28 PM2018-07-31T22:28:17+5:302018-07-31T22:29:15+5:30

शहरात २९ जून ते १३ जुलै या कालावधीत तापाच्या १७ रुग्णांना डेंग्यूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या ज्या रुग्णांचे रक्तजल नमुने यवतमाळ येथील सेंटिनल सेंटर या शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले, त्याबाबतचा अहवाल मंगळवारी महापालिकेला प्राप्त झाला. त्यात १७ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

Dengue: 17 positive | डेंग्यू : १७ पॉझिटिव्ह

डेंग्यू : १७ पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देयवतमाळच्या सेंटिनल सेंटरचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात २९ जून ते १३ जुलै या कालावधीत तापाच्या १७ रुग्णांना डेंग्यूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या ज्या रुग्णांचे रक्तजल नमुने यवतमाळ येथील सेंटिनल सेंटर या शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले, त्याबाबतचा अहवाल मंगळवारी महापालिकेला प्राप्त झाला. त्यात १७ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूसदृश तापाने आजारी असलेल्या रुग्णांचे रक्तजल नमुने संकलित केले जातात. ते रक्तजल नमुने जिल्हा हिवताप अधिकाऱ्यामार्फत शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. त्या प्रयोगशाळेने १३ जुलैपर्यंतच्या नमुन्यांचा अहवाल महापालिका व जिल्हा हिवताप कार्यालयाला पाठविला आहे. त्यावरून शहरात डेंग्यूवर शिक्कामोर्तब झाले आहे. याआधी डॉ. मनोज निचत यांनी त्यांच्याकडील रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती माध्यमांसह आ. रवि राणा यांना दिली होती. मात्र, सेंटिनल सेंटरचा अहवाल प्राप्त होत नाही, तोपर्यंत ते रुग्ण आरोग्य यंत्रणेच्या लेखी संशयित असल्याची भूमिका आयुक्त संजय निपाणे, आरोग्य अधिकारी डॉ. सीमा नैताम, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम व जिल्हा हिवताप अधिकारी सुरेश तरोडेकर यांनी घेतली होती. आता खासगी डॉक्टरांचा दावा खरा ठरला आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी महापालिका प्रशासनाने आयएमए आणि खासगी डॉक्टरांची बैठक घेतली. यात आयएमएचे अध्यक्ष डॉ. पद्माकर सोमवंशी, डॉ. सुभाष तितरे, डॉ. सीमा अडवाणी, डॉ. सोनाली शिरभाते, डॉ. ऋषीकेश नागलकर, डॉ. रवि खेतान, डॉ. जे.पी. लढ्ढा सहभागी झाले.

चैतन्य कॉलनीमधील चार रूग्णांचा समावेश

चैतन्य कॉलनीतील चार रुग्णांसह दस्तुरनगरमधील दोन रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह निघालेत. त्याशिवाय न्यू गणेशनगर, ख्रिस्त कॉलनी, रविनगर, दत्त कॉलनी, देशपांडे लेआऊट, यशोदानगर, टेलिकॉम कॉलनी, सबनिस प्लॉट, गाडगेनगरमध्ये राहणाºया रुग्णांना डेंग्यूची लागण झाली होती. १७ पैकी ११ पुरुष व सहा महिला रुग्ण आहेत.
सात डॉक्टरांकडे डेंग्यू पॉझिटिव्ह
ज्या डॉक्टरांकडे डेंग्यूची लागण झाल्याचा अहवाल शासकीय प्रयोगशाळेने दिला आहे, त्यापैकी पाच रुग्ण डॉ. समीर चौधरी, चार रुग्ण डॉ. मनोज निचत, तीन रुग्ण डॉ. विजय बख्तार, दोन रुग्ण डॉ. अद्वैत महल्ले, तर प्रत्येकी एक रुग्ण डॉ. सचिन काळे, डॉ. नीलेश पाचबुद्धे व डॉ. अजय डफळे यांच्याकडे दाखल होता.
५३ हजार गृहभेटी
डेंग्यू नियंत्रणासाठी २२ ते २९ जुलै दरम्यान ५३,७०४ गृहभेटी देण्यात आल्या. २,४४,८७६ लोकांपर्यंत महापालिकेचे पथक पोहोचले. मोहिमेदरम्यान १४२५ तापाचे रुग्ण आढळून आले. ६४० रक्तनमुने घेण्यात आले. २९१३ घरांमध्ये डासअळी आढळून आली. १,८९,९७७ पाणीसाठे तपासले. पैकी ७२१२ पाणीसाठे दूषित आढळले. पाच हजार पाणीसाठे रिकामे करण्यात आले. २६२ ठिकाणी गप्पीमासे सोडले. १९७६ ठिकाणी टॅमिफॉस टाकल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

Web Title: Dengue: 17 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.