वऱ्हा येथे विद्यार्थ्यांमार्फत डेंग्यू जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:16 AM2021-08-14T04:16:10+5:302021-08-14T04:16:10+5:30
वऱ्हा : स्थानिक माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांमार्फत गावात डेंग्यू जनजागृती करण्यात आली. तिवसा येथील गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये हा उपक्रम १२ ...
वऱ्हा : स्थानिक माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांमार्फत गावात डेंग्यू जनजागृती करण्यात आली. तिवसा येथील गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये हा उपक्रम १२ ऑगस्ट रोजी पार पडला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना डेंगी आजार बाबत सखोल माहिती देऊन डेंग्यू आजार कसा होतो, आजारची लक्षणे काय आहेत, आजाराला कशा प्रकारे आळा बसवता येतो तसेच डासअळी भक्षक गप्पीमाशांचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन कुऱ्हा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी येऊल व बहुउद्देशीय कर्मचारी आर.टी. आटोळे यांनी केले. विध्यार्थ्यांना एका पात्रात लार्वा ( चामडोक ) आणी एका पात्रात गप्पी मासे घेऊन त्यांची ओळख दिली तसेच गप्पीमासे कशा प्रकारे लार्वा खातात, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. गप्पीमासे लार्वा किती वेगाने खातात, हे सर्व विद्यार्थी कुतूहलाने पाहत होते.
यानंतर गावातून डेंग्यू जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली. प्रभातफेरीतील घोषणांनी वऱ्हानगरी दुमदुमली होती. पंचायत समिती सदस्य नीलेश खुळे, आरोग्य सेविका कांबळे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली ....................... व उल्का........................., ग्रामविकास अधिकारी एस.एन. बनसोड, उपसरपंच अंकुश बहातकर, सदस्य किशोर लोखंडे तसेच शिक्षक वृंद, गावातील सर्व आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांनी सहभाग घेतला होता.