शाळा, शासकीय कार्यालयांमध्ये डेंग्यू डासांची उत्पत्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 10:24 PM2018-07-30T22:24:33+5:302018-07-30T22:25:51+5:30
शहरात सर्वदूर डेंग्यूने कहर केल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने डासांची उत्पत्तीस्थळे निष्कासित करण्यासाठी पाऊल उचलले आहे. या मोहिमेत काही महाविद्यालये, शाळा व सरकारी कार्यालयांमध्ये डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मोहिमेदरम्यान आढळलेली डासांची उत्पत्तीस्थळे निष्कासित करण्यात आली आहेत.
Next
ठळक मुद्दे१ आॅगस्टपासून शालेय जनजागृती मोहिमउपत्तीस्थळ निष्कासित
<p>लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात सर्वदूर डेंग्यूने कहर केल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने डासांची उत्पत्तीस्थळे निष्कासित करण्यासाठी पाऊल उचलले आहे. या मोहिमेत काही महाविद्यालये, शाळा व सरकारी कार्यालयांमध्ये डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मोहिमेदरम्यान आढळलेली डासांची उत्पत्तीस्थळे निष्कासित करण्यात आली आहेत.
शहरातील खासगी रूग्णालयात दाखल डेंग्यू संशयितांची संख्या २६७ वर गेल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आ. रवि राणा यांच्या भेटीनंतर आयुक्तांनी डेंग्यू नियंत्रणासाठी ५२ पथके गठित केली. त्यापूर्वीही मोहीम राबविली जात होती. मात्र, राणांच्या तंबीने मोहिमेला गती देण्यात आली. रविवार २२ जुलैपासून शहरात ३० हजारावर गृहभेटी देण्यात आल्या. दरम्यान शाळा, महाविद्यालये व सरकारी कार्यालयाची तपासणी करण्यात आली. तेथील पाणीसाठे रिकामे करण्यात आले. सर्वाधिक डेंग्यू डास उत्पत्ती स्थळे असलेल्या ठिकाणी फवारणी करण्यात आली.यात काही शाळा व सरकारी कार्यालय परिसरात साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्यात. डेंग्यूच्या डासांची पैदास साठून राहिलेल्या पाण्यात वातानुकुलित यंत्रे, कुलर व अडगळीत होते. आठवड्याभरापासून सार्वजनिक मालमत्ता, कार्यालये, गृहनिर्माण संस्थांची तपासणी करून डेंग्यू डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यात येत आहे.
डेंग्यूच्या अनुषंगाने ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून शाळा-महाविद्यालयांतील पाणीसाठे रिकाम्या करण्याच्या सूचना पथकाला दिल्या आहेत. गृहभेटीवर भर दिला जात आहे.
- नरेंद्र वानखडे
उपायुक्त, महापालिका
मोहिमेदरम्यान काही सरकारी कार्यालये व शाळांमध्ये डेंग्यू डास उत्पत्ती स्थळे आढळून आली. १ ते १५ आॅगस्ट दरम्यान शाळा व कनिष्ट महाविद्यालयांमध्ये डेंग्यूबाबत जनजागृती करू.
- एम.एम.मुरके, वैद्यकीय अधिकारी, महापालिका