शहरात डेंग्यूचा कहर, पालिका ढिम्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:11 AM2021-07-20T04:11:09+5:302021-07-20T04:11:09+5:30
मोर्शी : शहरामध्ये दिवसागणिक डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असताना सोमवारी रामजीबाब नगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते दिनेश महहले यांचा एकुलता ...
मोर्शी : शहरामध्ये दिवसागणिक डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असताना सोमवारी रामजीबाब नगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते दिनेश महहले यांचा एकुलता एक मुलगा हिमांशू महहले याचा डेंग्यू या आजाराने मृत्यू झाला. असे असतानाही नगर परिषद प्रशासनाने अजूनपर्यंत थातुरमातुर फवारणी वगळता प्रभावी उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत नगर परिषदेच्या आवारात उपाध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, नगरसेविका वैशाली भूषण कोकाटे, क्रांती चौधरी, लता परतेकी, नगरसेवक दीपक नेवारे यांच्या नेतृत्वात ताट व टाळ वाजवत थाळी बजाव, भजन करा आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी नगर परिषदेमध्ये सतत गैरहजर राहणाऱ्या मुख्याधिकारी यांच्या खोलीला कुलूप लागले असता नावाच्या प्लेटला हारार्पण करण्यात आले तसेच आरोग्य विभाग प्रमुखांच्या खुर्चीला हार घालून निषेध करण्यात आला तसेच ठिय्या आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी निषेधाचे नारेसुद्धा देण्यात आले. याप्रसंगी मोर्शी शहरातील सामाजिक कार्यकर्ते आबुभाऊ बारस्कर, ओंकार काळे, सुरेंद्र परतेकी, भूषण कोकाटे, सत्तार शहा, राजेंद्र लाखोडे, पंकज ढोंगे, आशिष बेलूरकर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.