डेंग्यूने वाढविला ड्रॅगन फ्रुटचा भाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:26 AM2021-09-02T04:26:35+5:302021-09-02T04:26:35+5:30
अमरावती : श्रावण महिन्यात अनेकांना उपवास राहत असल्याने फ्रुटची मागणी वाढते. अशातच आता डेंग्यूचा उद्रेक वाढल्याने डेंग्यूवर रामबाण उपाय ...
अमरावती : श्रावण महिन्यात अनेकांना उपवास राहत असल्याने फ्रुटची मागणी वाढते. अशातच आता डेंग्यूचा उद्रेक वाढल्याने डेंग्यूवर रामबाण उपाय म्हणून आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ड्रॅगन फ्रुटला अधिक पसंती दिली जात आहे. फळबाजारात ड्रॅगन फ्रुट हे महागडे असले तरी अन्य फळाच्या तुलनेत ग्राहकांची त्याला पसंती मिळत आहे.
-------------
फळांचे दर (प्रति किलो)
ड्रॅगन फ्रुट : १२० (प्रति नग)
डाळिंब : १२०
सफरचंद : १२०
संत्रा : ५०
मोसंबी: ४०
चिकू :८०
पपई : ४०
पेरू: ८०
-----------------
आवक वाढल्याने सफरचंद झाले स्वस्त
- शिमला, काश्मिर येथे उत्पादीत होणाऱ्या सफरचंदाची ऑगस्ट महिन्यात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रारंभी १६० रुपये प्रतिकिलो दराने विकले जाणारे सफरचंद हल्ली ८० ते १०० रुपए किलो विक्री केले जात आहे.
- सप्टेंबरमध्ये सफरचंदाची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे संकेत व्यावसायिकांनी दिले आहेत. पुढे सफरचंद आणखी स्वस्त होतील. मात्र, सफरचंदाच्या तुलनेत ड्रॅगन फ्रुट महागडेच आहे.
---------------------
डे्ग्यूवर ड्रॅगनचा उतारा
डेंग्यू झाल्यानंतर प्रतिकारशक्ती खालावते. साधारणत: आजारी व्यक्ती ही सफरचंद, चिकू, संत्र्याला पसंती देतात. मात्र, डेंग्यूवर रामबाण उपाय म्हणून ड्रॅगन फ्रुट असल्याचे आहार तज्ज्ञांनी सल्ला दिल्याने या फ्रुटवर हल्ली उड्या पडत आहे. त्यामुळे ड्रॅगन फ्रुट महाग विकले जात आहे. शरीरातील रक्ताच्या पेशी वाढविण्यासाठी हे फ्रुट उपयोगी ठरत आहे.
-----------
बाजारात अन्य फळांच्या तुलनेत महिन्याभरापासून ड्रॅगन फ्रुटची मागणी वाढली आहे. थायलंड येथे उत्पादीत होणारे ड्रॅगन फ्रुट हे मुंबई येथील फळबाजारातून अमरावतीत आणले जाते, आठवड्यातून दोन पेट्या मागविल्या जात आहेत. रूग्णांच्या आरोग्यासाठी ते रामबाण ठरत आहे.
-राजा मोटवाणी, व्यापारी.