खासगी रुग्णालयात पुन्हा डेंग्यूचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 10:42 PM2018-08-05T22:42:31+5:302018-08-05T22:43:22+5:30

खासगी डॉक्टरांकडून मिळालेली डेंग्यू रुग्णांची माहिती व महापालिकेने यवतमाळच्या सेंटिनल सेंटरमध्ये पाठविलेल्या डेंग्यूसंशयिताच्या रक्तनमुन्यांची माहिती यामध्ये तफावत आढळून येत असल्याने आठ दिवसांत खासगी डॉक्टरांकडे जाऊन पुन्हा माहिती घेऊन ती सादर करा, अशा सूचना महापालिका आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांना आरोग्य सेवा सहायक संचालक (हिवताप ) अभिनव भुते यांनी दिल्या आहेत.

Dengue Surveys Again in Private Hospital | खासगी रुग्णालयात पुन्हा डेंग्यूचे सर्वेक्षण

खासगी रुग्णालयात पुन्हा डेंग्यूचे सर्वेक्षण

Next
ठळक मुद्देआरोग्य अधिकाऱ्यांना अल्टीमेटम : बुधवारी सहायक संचालकांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खासगी डॉक्टरांकडून मिळालेली डेंग्यू रुग्णांची माहिती व महापालिकेने यवतमाळच्या सेंटिनल सेंटरमध्ये पाठविलेल्या डेंग्यूसंशयिताच्या रक्तनमुन्यांची माहिती यामध्ये तफावत आढळून येत असल्याने आठ दिवसांत खासगी डॉक्टरांकडे जाऊन पुन्हा माहिती घेऊन ती सादर करा, अशा सूचना महापालिका आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांना आरोग्य सेवा सहायक संचालक (हिवताप ) अभिनव भुते यांनी दिल्या आहेत.
जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयात शनिवारी ही बैठक पार पडली. डेंग्यूसंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुरेश तरोडेकर यांनासुद्धा देण्यात आल्या आहेत. बैठकीला आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्यासह अनेक वैद्यकीय अधिकाºयांची उपस्थिती होती. बुधवारी पुन्हा अधिकाºयांची बैठक घेण्यात येणार आहे.
शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये नेमके किती डेंग्यू संशयित रुग्ण आढळून आले, खासगी पॅथॉलॉजीमध्ये किती रुग्णांची तपासणी झाली, यासंदर्भात माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे देण्यात आली की नाही, याची माहिती घेऊन ती जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाला सादर करावी लागेल. यवतमाळच्या सेंटिनल सेंटरमध्ये महापालिकेने किती रक्तनमुने पाठविले, ते वेळेत पाठविले की नाही, यासंदभार्ची माहितीसुद्धा मागविण्यात आली आहे. महापालिका आणि जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या आरोग्य कर्मचाºयांना खासगी डॉक्टरांकडे तसेच खासगी पॅथॉलॉजिस्टकडे पाठविण्यात येणार आहे. यानंतरच नेमके डेंग्यूचे किती संशयित रुग्ण आहेत व शासकीय अहवाल वा खासगी डॉक्टरांनी केलेल्या चाचणीत डेंग्यूचे किती रुग्ण पॉझिटिव्ह निघाले, यासंदभार्ची अधिकृत माहिती कळू शकेल, असे मत बैठकीत डॉ. भुते यांनी व्यक्त केले.
३० रुग्ण डेंग्यूचे पॉझिटिव्ह शासकीय अहवाल
महापालिका व जिल्ह्यातील ग्रामीण भागातून २७० पेक्षा जास्त रक्तनमुने यवतमाळच्या सेंटिनल सेंटरमध्ये तपासणीसाठी पाठविले होते. यामध्ये शनिवारपर्यंत जिल्ह्यात ३० रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल जिल्हा हिवताप अधिकाºयांना प्राप्त झाल्याची माहिती आरोग्य सेवा सहायक संचालक ( हिवताप) डॉ. अभिनव भुते यांनी दिली. पण, खासगी डॉक्टरांनी केलेल्या इलायझा व एनएस-वन चाचणीत १३१ जास्त नमुने डेंग्यू पॉझिटिव्ह निघाले. त्याकारणाने यंत्रणा कामाला लागली आहे. ‘लोकमत’ने सर्वप्रथम हा प्रश्न लोकदरबारात मांडताच आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.

Web Title: Dengue Surveys Again in Private Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.