मूग पिकासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:09 AM2021-07-23T04:09:45+5:302021-07-23T04:09:45+5:30
लीफ क्रिनकल रोगाचा प्रादुर्भाव मुख्यत: रोगग्रस्त बियाणांद्वारे होतो. या रोगाचा दुय्यम प्रसार रसशोषण करणाऱ्या (मावा, पांढरी माशी व फुलकिडे) ...
लीफ क्रिनकल रोगाचा प्रादुर्भाव मुख्यत: रोगग्रस्त बियाणांद्वारे होतो. या रोगाचा दुय्यम प्रसार रसशोषण करणाऱ्या (मावा, पांढरी माशी व फुलकिडे) किडीमुळे होतो. रोगग्रस्त झाडाच्या पानावर खोलगट व उभरलेल्या भेगा दिसतात. झाडे खुरटी व खुजी दिसतात. शेंड्याकडून खाली वाळत येतात. रोगग्रस्त झाडाला फुलोरा उशिरा येतो व या फुलोऱ्यास शेंगा लागत नाहीत.
या रोगाच्या नियंत्रणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील कीटकशास्त्र विभाग प्रमुखांनी सुचवलेल्या शेतकऱ्यांनी उपायोजना करणे आवश्यक आहे.
सल्ला कृषी विभागाचा
• शेत तणविरहित ठेवावे. ईश्वरी, चवळी, कोटी या तणावर सदर विषाणू जिवंत राहतो. तेथूनच किडीद्वारे पिकावर येतो. या तणांचा नाश करावा.
• पिकात जास्त नत्रखत देणे टाळावे, त्यामुळे पिकाची कायिक वाढ होते व किडीचा प्रादुर्भाव वाढतो.
• पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतात पेरणीनंतर पंधरा दिवसांनी पिवळे चिकट सापळे १५बाय ३० सेमी आकाराचे हेक्टरी पिकाच्या उंचीच्या एक फूट उंचीवर लावावे.
• मावा, पांढरी माशी व फुलकिडींचा प्रादुर्भाव दिसताच किंवा लीफ क्रिनकल विषाणूची सुरुवात दिसताच फिप्रोनिल ५ टक्के एससी २० मिली किंवा फ्लोनीकामाईड ५० टक्के डब्ल्यूजी ३ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड १७ मिली पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी फवारणी करावी. गरज भासल्यास १५ दिवसांनी दुसरी फवारणी करताना कीटकनाशके आलटून पालटून वापरावे.
यावर्षी पावसाचा खंड जास्त पडल्यामुळे मुगाची उशिरा पेरणी झाली ते पिक सध्या १० ते १५ दिवसांचे असेल त्या पिकावर प्रादुर्भाव दिसल्यास किंवा पुढील १० ते १२ दिवसांनी कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे, असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला.
220721\img-20210722-wa0084.jpg
मुग पिका साठी कृषी विभागाचे शिवरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन