विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 10:51 PM2019-01-30T22:51:26+5:302019-01-30T22:52:01+5:30
शासन लेखी आश्वासन देऊनही प्रलंबित प्रश्न, समस्या सोडवित नसल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बुधवारी येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडक दिली. स्थानिक सायन्स कोअर मैदानातून मूकमोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी आमदार बी.टी. देशमुख यांनी मोर्चेकऱ्यांना संबोधित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासन लेखी आश्वासन देऊनही प्रलंबित प्रश्न, समस्या सोडवित नसल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बुधवारी येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडक दिली. स्थानिक सायन्स कोअर मैदानातून मूकमोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी आमदार बी.टी. देशमुख यांनी मोर्चेकऱ्यांना संबोधित केले.
विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनच्या नेतृत्वात मूकमोर्चा काढण्यात आला. यावेळी विभागातील पाचही जिल्ह्यांतून कनिष्ठ महाविद्यालयांचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा मोर्चा सायन्स कोअर मैदान, मालटेकडी मार्गे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर पोहोचला. यावेळी छोटेखानी सभा घेण्यात आली. दरम्यान, सन २०११-२०१२ पासून शिक्षकांच्या वाढीव पदांना मान्यता, मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयाची यादी जाहीर करून अनुदान, विज्ञान व गणिताचे पूर्वीप्रमाणेच भाग १ व भाग २ असे पेपर, नीट व जेईई परीक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र, अकरावी प्रवेशाच्या पहिल्या तीन फेºया अनुदानित महाविद्यालयांच्या करण्यात यावे, सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना, औषधनिर्माशास्त्र व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या आॅनलाइन, आॅफलाइन परीक्षा घ्याव्यात, २४ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना विनाअट निवडश्रेणी, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे अशा विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
मोर्चात मनोहर वानखडे, अरविंद मंगळे, अविनाश बोर्डे, रमेश खाडे, दत्तात्रय जयपूरकर, प्रकाश काळबांडे, संजय देशमुख, गणेश वानखडे, रवींद्र कावरे, शिवराम बावस्कर, डी.एस. राठोड, अनिल काळे, रंगराव लांजेवार, भालचंद्र केंढे आदी उपस्थित होते.