पोलिसांसह कुटुंबीयांच्या समस्या सोडविण्याचे शासनाला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:47 AM2018-02-09T00:47:37+5:302018-02-09T00:48:13+5:30
पोलिसांवर मानसिक ताण आणणारी बारा तासांची ड्युटी आठ तासांची करण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी पोलीस बॉईज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.
ऑनलाईन लोकमत
अमरावती : पोलिसांवर मानसिक ताण आणणारी बारा तासांची ड्युटी आठ तासांची करण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी पोलीस बॉईज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागच्या बाजूला पोलीस परिवारातील शेकडो सदस्य एकत्र आले व तेथून शिस्तबद्ध येऊन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची त्यांनी भेट घेतली. विविध मागण्यांसंदर्भात यावेळी चर्चा झाली. पोलीस निरीक्षक व तहसीलदार तसेच तलाठी व फौजदार यांची एकच रँक असताना वेतनात तफावत आहे; ती दूर करावी. पोलीस निवासस्थानांची दुुरुस्ती करावी व नवीन निवासस्थानांचा लाभ देण्यात यावा. पोलीस ठाण्यात महिला व पुरुषांचे स्वतंत्र स्वच्छतागृह असावेत. साप्ताहिक रजेच्या आधी रात्रपाळीची ड्युटी देऊ नये. दरमहा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करावी, यासह विविध मागण्या करण्यात आल्या.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमरावती : पोलीस बाईज असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष प्रमोद वाघमारे, जिल्हाध्यक्ष बृजभूषण देशमुख, यवतमाळचे जिल्हाध्यक्ष अतिक शेख, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर भिवगडे, राज्य संघटक गणेश शिरसाट यांच्यासह लीलाबाई मेश्राम, कल्पना नागभिडकर, पद्मा पुरी, नर्गीस फातेमा, नंदा राऊत, अनिता तायडे, छाया कवठाळे, माधुरी बालस्कर, मीनाक्षी ठाकरे, राधा कांबळे, सुनीता जामनेकर, शोभा साबळे, शीला सावळे, शाशा भोगे, अर्चना पंडित, हेमलता राऊत, गिरजा बागडे, ज्योती गोपकर, ज्योती बनसोड, लक्ष्मी तांदूळकर, उषा पातूरकर, अरुणा ठाकरे आदी उपस्थित होते.