गौण खनिज रॉयल्टी, मुद्रांक शुल्क सामान्य निधीत जमा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:10 AM2021-07-16T04:10:27+5:302021-07-16T04:10:27+5:30
अमरावती : गौण खनिज रॉयल्टी, मुद्रांक शुल्काची रक्कम तात्काळ ग्रामपंचायतींच्या सामान्य निधीमध्ये जमा व्हावा, अशी मागणी ग्राम संवाद सरपंच ...
अमरावती : गौण खनिज रॉयल्टी, मुद्रांक शुल्काची रक्कम तात्काळ ग्रामपंचायतींच्या सामान्य निधीमध्ये जमा व्हावा, अशी मागणी ग्राम संवाद सरपंच संघाचे अमरावती तालुका अध्यक्ष मंगेश महल्ले यांनी केली आहे
कोरोनाकाळापासून नियमित फवारणी, मुनादी, गावबंदी व इतर बाबींवर होणाऱ्या खर्चाचा बोजा ग्रामीण भागात ग्रामपंचायतीवरच येऊन पडला होता. कोरोनाकाळात ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणारी कर वसुलीची आकडेवारी मोठ्या प्रमाणात घसरल्याचे चित्र सर्वच ग्रामपंचायतींमध्ये पाहण्यास मिळत आहे. ग्रामपंचायतींना दरवर्षी मिळणारी त्यांच्या हक्काची गौण खनिज रॉयल्टी व मुद्रांक शुल्काची रक्कम मार्च महिन्याच्या शेवटी सामान्य फंडात जमा होते. पावसाळ्यातील कामे व कर्मचाऱ्यांचे प्रलंबित पगार यामुळे होऊ शकतात. राज्य अध्यक्ष अजिनाथ धामणे, उपाध्यक्ष प्रमोद भगत, सचिव विशाल लांडगे, महिला प्रदेश अध्यक्ष कल्याणी राजस, राज्य मार्गदर्शक व प्रशिक्षण प्रमुख गंगाभाऊ धंडारे, विदर्भ विभाग सचिव सविता आहाके, विष्णुपंत तिरमारे, दीपाली गोडेकर, सविता तिरमारे, जिल्हाध्यक्ष तेजस्विनी भिरकड, सचिव दीपाली उगले, महिला उपाध्यक्ष मंगला मोरे, उज्वला देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष आशिष निंभोरकर, संजय गुजर, कोषाध्यक्ष प्रवीण ठवळी, जिल्हा सरचिटणीस उज्ज्वल दवळी, भारत जाधव, सरचिटणीस (महिला) रोशनी निंभोरकर, अक्षता खडसे, प्रसिद्धीप्रमुख निकेत ठाकरे, मीडिया प्रमुख दीपक बाभूळकर, संघटक प्रदीप कुबडे, मार्गदर्शक सल्लागार दीपक गवई, समन्वयक गजानन बनसोड, कार्यकारिणी सदस्य सुरेश बारस्कर, राजेश कवाडे, अर्चना भुस्कडे, जयश्री उईके, ममता राठी, मंगेश जोगे आदी लवकर गटविकास अधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना निवेदन देणार आहेत.