लग्न जुळत नसल्याने नैराश्य; उपवर तरूणीने उचललं टोकाचं पाऊल

By प्रदीप भाकरे | Published: July 18, 2023 01:33 PM2023-07-18T13:33:25+5:302023-07-18T13:34:52+5:30

बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Depression due to marriage mismatch; young woman committed suicide! | लग्न जुळत नसल्याने नैराश्य; उपवर तरूणीने उचललं टोकाचं पाऊल

लग्न जुळत नसल्याने नैराश्य; उपवर तरूणीने उचललं टोकाचं पाऊल

googlenewsNext

अमरावती : लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून एका २५ वर्षीय तरूणीने गळफास घेऊन आत्मघात करवून घेतला. १७ जुलै रोजी दुपारी बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी ही घटना उघड झाली. याप्रकरणी, बडनेरा पोलिसांनी सोमवारी रात्री आकस्मिक मृत्युची नोंद केली. उज्वला असे मृत तरूणीचे नाव आहे.

उपवर तरूण मुलीने आकस्मिक उचललेल्या या आत्मघाती पावलामुळे तिच्या कुटंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. उज्वला ही आईवडील व भावासह बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात राहत होती. ती कला शाखेची पदवीधर होती. तर भाऊ स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करीत होता. दरम्यान उज्वला हिच्या लग्नासाठी उपवर मुले शोधणे सुरू होते. मात्र तिचे लग्न जुळत नव्हते. सोबतच्या मैत्रिणींची लग्न झालेत, पण तिचे लग्न जुळत नसल्याने ती नेहमी नाराज राहत होती. त्यामुळे तिची मानसिकता खराब होऊन तिने स्वत:च गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूबाबत आपला कुणावरही संशय नसून कुणाविषयीही तक्रार नसल्याचे पोलिसांना दिलेल्या बयानात तिच्या कुटूंबियांनी म्हटले आहे.

आई घराबाहेर असताना फॅनला झुलली

१७ जुलै रोजी उज्वलाचे वडील कामावर गेले होते. तर, भाऊ लायब्ररीमध्ये गेला होता. दुपारी १२.३० च्या सुमारास तिची आई जेवण करून घराबाहेर बसली असता, तिने घराचे दार, खिडक्या बंद केल्या. ती दार उघडत नसल्याने तिच्या आईने आरडाओरड करून आजुबाजुच्या लोकांना बोलावले. घराचे दार तोडून आत पाहिले असता उज्वला ही किचनमधील पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. तिला रूग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी मृताच्या भावाच्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Web Title: Depression due to marriage mismatch; young woman committed suicide!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.