वंचित बहुजन आघाडीने महागाई विरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:10 AM2021-06-22T04:10:07+5:302021-06-22T04:10:07+5:30
जिल्हाकचेरीवर धडक; सरकारच्या धोरणाचा निषेध अमरावती : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे कोरोना महामारीच्या काळातही महागाई गगणाला भिडलेली ...
जिल्हाकचेरीवर धडक; सरकारच्या धोरणाचा निषेध
अमरावती : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे कोरोना महामारीच्या काळातही महागाई गगणाला भिडलेली आहे. या विरोधाता वंचित बहुजन आघाडीने सोमवारी जिल्हा कचेरीसमारे एक दिवसीय धरणे आंदोलन करीत सरकारच्या धोरणाचा निषेध केला. यावेळी मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतीसह पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
सन २०१९ च्या निवडणुकीत केंद्र व राज्य सरकारने वाढती महागाई कमी करण्याचे आश्वासन सर्वसामान्य जनतेला दिले होते. याला दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. या काळात महागाई कमी झाली नाही. उलट वाढल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. काही दिवसात पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरचे दर भडकले. त्यामुळे सर्वसामान्यांना या महागाईची अधिक झळ सोसावी लागत आहे. कोरोना काळातही वाढत्या महागाईचा फटका जनतेला सहन करावा लागत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने वाढती महागाई रोखून जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई, रमेश आठवले, साहेबराव नाईक, बाबाराव गायकवाड, प्रकाश बोरकर, बबलू रामटेके, अंबादास सरोदे, संजय कापडे, ज्ञानेश्र्वर डोंगरे, प्रफुल्ल वाकोडे आदींनी केली आहे.