कार्बाईडने पिकविलेले १२० किलो आंबे नष्ट

By admin | Published: April 23, 2016 12:07 AM2016-04-23T00:07:13+5:302016-04-23T00:07:13+5:30

कॅल्शियम कार्बाईर्डने पिकविलेला १२० किलोचा आंबा अन्न व औषधी प्रशासनाने शुक्रवारी नष्ट केला.

Destroying 120 kg of mangoes grown by carbide | कार्बाईडने पिकविलेले १२० किलो आंबे नष्ट

कार्बाईडने पिकविलेले १२० किलो आंबे नष्ट

Next

अन्न, औषधी प्रशासनाची कारवाई : नमुने प्रयोगशाळेत पाठविणार
अमरावती : कॅल्शियम कार्बाईर्डने पिकविलेला १२० किलोचा आंबा अन्न व औषधी प्रशासनाने शुक्रवारी नष्ट केला. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ बाजारात यंदाची ही पहिलीच कारवाई असून कार्बाईडने पिकविलेल्या आंब्यांचे काही नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.
दरवर्षी शहरातील बाजारात कॅल्शीयम कार्बाईडने पिकविलेले आंबे विक्रीसाठी येतात. हे आंबे मानवी शरिासाठी घातक असतानाही व्यापारी वर्ग पैश्यांच्या हव्यासापोटी नागरिकांच्या जीवाशी खेळतात. गेल्या वर्षांतही अन्न व औषधी प्रशासन विभागामार्फत शहरातील विविध ठिकाणी धाडी टाकून कॅल्शीअम कार्बाईडमध्ये पिकविलेली आंबे नष्ट करण्यात आली होती. यंदाही उन्हाळ्यात त्यांच्याकडून धाडसत्र राबविण्यात आले आहे. शुक्रवारी एडीएचे सहायक आयुक्त (अन्न) मिलींद देशपांडे यांच्या नेत्तृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी फरीद सिध्दीकी व निलेश ताथोड यांनी कृषि उत्पन्न बाजार समितीमधील काही फळ विक्रेत्यांच्या दुकानातील आंबा, केळी व अन्य काही फळांची तपासणी सुरु केली होती. त्यामध्ये मनोजकुमार मोटवानी (कृष्णा नगर) यांच्या इंडिया फ्रुट कंपनी प्रतिष्ठानातील आंब्याच्या पेट्यांमध्ये कार्बाईडने पिकविलेली आंबे आढळली.

चांगला आंबा असा ओळखावा
नैसर्गीक पिकलेला आंबा हा पिवळा व हिरवा रंगाचा असते. त्यातच नैसर्गिक आंब्याचा गोडवा ओळखू येण्यासारखा असतो. मात्र, ज्या आंब्याचा रंग गर्द पिवळा असतो. असे आंबे हे कार्बाईडमध्ये पिकविले असतात. अशा आंब्यावरील रंग हा एकसारखा असल्याचे दिसून येते. तसेच त्या आंबाचा गोडवासुध्दा कमी असल्याचे आढळून येते.

शहरात कार्बाईडचा वापर, कारवाईचे काय ?
शहरात कॅल्शीअय कार्बाईडचा वापर करून केळी व आंबे पिकविण्यासाठी होत आहे. लोकमतने याबाबत सचित्र वृत्त प्रकाशित केल्यानंतर अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी कारवाई केली खरी, पंरतू ही कारवाई थातुरमातूर असून शहरात आंबे व केळी विक्री होत आहे. यासाठी कॅल्शीअम कार्बाईड व इथेलिन गॅसचा वापर होतो.

Web Title: Destroying 120 kg of mangoes grown by carbide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.