आत्मदहनाचा प्रयत्नात असलेली ती महिला डिटेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:10 AM2021-06-18T04:10:36+5:302021-06-18T04:10:36+5:30

अमरावती: वडिलापार्जित शेताचा ताबा नायब तहसीलदारांनी परस्पर गावातील काही व्यक्तींना देऊन कुटुंबाला भूमिहीन केले. याप्रकरणात शासनदरबारी न्याय मिळत नसल्याच्या ...

Detain the woman who attempted self-immolation | आत्मदहनाचा प्रयत्नात असलेली ती महिला डिटेन

आत्मदहनाचा प्रयत्नात असलेली ती महिला डिटेन

Next

अमरावती: वडिलापार्जित शेताचा ताबा नायब तहसीलदारांनी परस्पर गावातील काही व्यक्तींना देऊन कुटुंबाला भूमिहीन केले. याप्रकरणात शासनदरबारी न्याय मिळत नसल्याच्या मुद्द्यावर बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. तिला तातडीने गाडगेनगर ठाण्यात आणण्यात आले. याप्रकरणी सामूहिक आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता.

कल्पना जवादे असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कलगाव येथील जवादे कुटुंबीयांना सन १९७२ मध्ये शासनाने दहा एकर शेतजमीन दिली. शेत सर्व्हे नंबर १३०/१ मुक्ताबाई गोविंद जवादे व सर्व्हे नंबर १३०/२ मध्ये अंबादास गोविंद जवादे यांच्या नावे मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले. १९७२ पासून जवादे कुटुंब या शेतीवर उदरनिर्वाह करीत आहे. मात्र, शासनाकडे शेत सर्व्हे नंबरची नोंद चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याने शेतीचा वाद उपस्थित झाला. ती चूक महसूल अधिकारी व तहसीलदार यांच्या निर्दशनास आणून दिल्याचे कल्पना जवादे यांचे म्हणणे आहे. प्रकरण पुसद उपविभागीय अधिकाऱ्यांकडे न्यायप्रविष्ट असताना, नायब तहसीलदार विजय इंगोले, मंडळ अधिकारी गुुल्हाने, तलाठी नारायण हगवणे, दिग्रस पोलीस ठाण्याचे जमादार हे ७ जूनला शेतात आले. सर्वांनी कल्पना जवादे यांना शिवीगाळ केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली व पिकाचे नुकसान करून हाकलून दिले. कल्पना जवादे यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रपरिषदेत हे आरोप केले होते.

त्यासंबंधी तक्रारही दिग्रस ठाण्यात दाखल केली. मात्र, या प्रकरण कुठलाही गुन्हा नोंदविण्यात आला नाही. या प्रकरणात न्याय न मिळाल्यास १६ जून रोजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा जवादे कुटुंबीयांनी दिला होता. मात्र, गाडगेनगर पोलिसांनी सदर महिलेला वेळीच ओळखून आरटीओ कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरून डिटेन केले. त्यानंतर पोलिसांनी उपायुक्त संजय पवार यांच्याकडे कल्पना यांना आणले. पवारांनी कैफीयत ऐकून घेतली तसेच संबंधित अधिकाऱ्यांना प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर हा वाद निवळला.

बॉक्स:

अन् ती महिला झाली गायब

कल्पना जवादे व त्यांचा भाऊ दोघे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पोहोचले. पोलिसांन. भावाला ताब्यात घेतले, मात्र कल्पना यांनी पळ काढला. शिवाजीनगरच्या दिशेने पोलिसांन. पठलाग केला. मात्र, पकडणे शक्य झाले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूला एका ऑटोरिक्षात बसलेली ती पोलिसांन. आढळली.

कोट

आत्मदहनाचा इशारा दिल्याने सदर महिलेला डिटेन केले. त्यानंतर ठाण्यात आणून तिची समजूत काढण्यात आली. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्तांच्या दालनात हजर केले.

मोहन कदम, पोलीस निरीक्षक गाडगेनगर

Web Title: Detain the woman who attempted self-immolation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.