पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे बिघडतेय हवामानाचे संतुलन

By Admin | Published: March 23, 2017 12:09 AM2017-03-23T00:09:55+5:302017-03-23T00:09:55+5:30

शहरी तसेच ग्रामीण भागात सध्या अत्यंत निर्दयीपणे वृक्षतोड सुरू आहे.

Deteriorating weather balance due to environmental degradation | पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे बिघडतेय हवामानाचे संतुलन

पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे बिघडतेय हवामानाचे संतुलन

googlenewsNext

वृक्षांची कत्तल घातक : मान्सूनवर अवलंबून प्रदेशांना धोका
वैभव बाबरेकर ल्ल अमरावती
शहरी तसेच ग्रामीण भागात सध्या अत्यंत निर्दयीपणे वृक्षतोड सुरू आहे. वांझोटा विकास करण्यासाठी जी प्रचंड वृक्षतोड शासकीय यंत्रणा करते, त्याची १० टक्के सुद्धा भरपाई होेताना दिसत नाही. मागील वर्षी गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली दोन कोटी वृक्षलागवड योजना काही समाजकंटकांच्या मेहेरबानीमुळे फसलेली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात मृताला अग्नी देण्यासाठी सुद्धा लाकूड मिळेल की नाही, याबद्दल शंका आहे. वृक्षतोडीमुळे हवामानासाठी घिातक आणि भयकंर बदल होत आहेत, त्यामुळे भारतासारख्या मान्सूनच्या कृपेवर अवलंबून असलेल्या देशाचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आपली पुढील पिढी सुरक्षित रहावी, असे वाटत असेल तर सर्व नागरिकांनी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
२३ मार्च रोजी जागतिक हवामान दिन साजरा केला जातो. यादिवसाचे औचित्य साधून हे संपूर्ण वर्ष ‘ढग’, त्याचे प्रकार आणि हवामानावर होणारा परिणाम यावर विशेष जोर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ढगांचा एक जागतिक ‘अ‍ॅटलास’ बनविण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

हवामानाचे महत्त्व
हवामानाचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे दैनंदिन हवामान आणि दुसरा प्रकार म्हणजे दीर्घकालिन किंवा सरासरी हवामान. हवामानाचे घटक हे सभोवतालच्या भौगोलिक आणि नैसर्गिक घटकांवर अवलंबून असतात. हवामानाच्या कोणत्याही घटकात मानवी हस्तक्षेपामुळे बदल झाल्यास त्या ठिकाणच्या हवामानातही बदल व्हायला सुरूवात होते. विदर्भाच्या हवामानात काही बदल झाल्यास त्याचे परिणाम हजारो किलोमीटर अंतरावरील अमेरिकेलासुद्धा भोगावे लागू शकतात. म्हणूनच युरोप अमेरिकेसारखी प्रगत राष्ट्रे विकसनशिल देशांमधील हवामान किंवा पर्यावरण शाबूत रहावे, यासाठी कोट्यवधींचे अनुदान आणि कर्ज देत असतात. भारत किंवा आफ्रिकेमधील अनेक व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्ये विदेशी पैशांवरच कार्यरत असतात.

हवामान बदल आणि त्याचे परिणाम
एखाद्या ठिकाणचे सरासरी हवामानात काही बदल घडून येतात त्यावेळी तेथील हवामान बदल आहे, असे समजले जाते. जागतिक हवामान बदल संघटनेच्या अभ्यासानुसार जागतिक सरासरी तापमानामध्ये १ डिग्री सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यात हवामानात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्याची सुरूवात झाली असून हिवाळा लांबणे, एलनिनो, अवेळी आणि मोठ्या प्रमाणात होणारी गारपीट, हिमालयीन भागात कमी झालेले बर्फवृष्टीचे प्रमाण हे त्याचेच उदाहरण आहे

अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड करण्यात येत आहे. परंतु दोषींवर कारवाई केली जात नाही. शिवाय झाडे वाचविण्यासाठी शासकीय यंत्रणाही विशेष प्रयत्न करताना दिसून येत नाही. अशीच स्थिती राहिल्यास पर्यावरणाचा ऱ्हास अटळ आहे.
-अनिल बंड, हवामानतज्ज्ञ, अमरावती

Web Title: Deteriorating weather balance due to environmental degradation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.