देवेंद्र भुयारची तडीपारी म्हणजे राजकीय बळी !

By admin | Published: November 6, 2016 12:16 AM2016-11-06T00:16:55+5:302016-11-06T00:16:55+5:30

पं.स. टेंभूरखेडा गणाचे सदस्य तसेच युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भाध्यक्ष देवेंद्र भुयार यांनी अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरिता लढा दिला.

Deveer Bhayari is a political victim! | देवेंद्र भुयारची तडीपारी म्हणजे राजकीय बळी !

देवेंद्र भुयारची तडीपारी म्हणजे राजकीय बळी !

Next

हा कुठला न्याय? : शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्यास ठरविले गावगुंड
वरुड : पं.स. टेंभूरखेडा गणाचे सदस्य तसेच युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भाध्यक्ष देवेंद्र भुयार यांनी अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरिता लढा दिला. परंतु वारंवार आंदोलने केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याने मी कायदा व सुव्यवस्थेला बाधक ठरू शकतो, मी गुंड प्रवृत्तीचे असल्याचे अहवालात नमूद केल्याने पोलीस प्रशासनाने मला तडीपार घोषित केले. मात्र शेतकऱ्याच्या हितासाठी आंदोलने करून न्याय मिळवून देणारा गावगुंड असेल तर गावात फिरणारे गुन्हेगार प्रतिष्ठित आहे का, असा प्रतिसवाल देवेंद्र भुयार यांनी पत्रकार परिषदेत केला.
अखेर २ वर्षांकरिता तडीपारी म्हणजे राजकीय बळी असल्याची चचार् परिसरात आहे. शेतकऱ्यामध्ये तिव्र असंतोष निमाण केला जात आहे तर या तडीपारीचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. पंचायत समितीचे टेंभूरखेडा गणातून निवडून आलेले देवेंद्र भुयार यांनी संत्रा, कपाशीपासून तर कृषी मालाला भाव देणे, शेतकरी आत्महत्या थांबाव्यात, म्हणून शासनाने मदत देणे आदी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकरिता शासनाला वेठीस धरून आंदोलने मोर्चा काढले. परंतु पोलीस प्रशानाने गुन्हे दाखल करून तसा अहवाल उपविभागीय अधिकारी मोर्शीर् यांचेकडे सादर केला. तसा प्रस्ताव पाठवून शिफारस केली होती. यानुसार साक्षीदार तसेच जाब देणारे देवेंद्र भुयार यांचे बयाण नोंदवून उपविभागीय अधिकारी मोर्शी यांनी अमरावती जिल्ह्यातून २ वर्षांकरिता मुंबई पोलीस अधिनियमान्वये उपविभागीय दंडाधिकारी एम.ए.कडू यांनी केल्याचे आदेशपत्र ३ नोव्हेंबरला पाठविले. परंतु ही तडीपारी म्हणजे राजकीय बळी असल्याची चर्चा परिसरात आहे.

शेतकऱ्यांसाठी लढणे गुन्हा आहे काय ? : भुयार
माझी राजकीय प्रगती अनेकांकडून पाहिली जात नव्हती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ९ वर्षांपाूसन लढा देत आहे. अंध, अपंगाच्या शस्त्रक्रिया करवून आणल्या. गोरगरिबांची सेवा हाच माझा धर्म राहिला. मात्र आंदोलने करीत असताना कुठेही शासकीय मालमत्तेचे नुकसान किंवा कुणाच्याही जिवीतास हानी पोहेचली नसताना मला शासनाने गावगुंड घोषित केले. शेतकऱ्याकरीता आदंोलने, मोर्चे काढून न्याय देण्याचा प्रयत्न करणे गुन्हा आहे काय, असा प्रतिप्रश्नदेखील देवेंद्र भुयार यांनी उपस्थित केला आहे.

हिम्मत असेल तर हात लावा - खा. शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भाध्यक्ष देवेंद्र भुयार यांच्यावर आकसाने राज्य शासनाच्यावतीने पोलीस खात्याव्दारे दोन वर्षांकरिता तडीपारीचे आदेश काढले. याचा मी व संघटनेच्यावतीने तीव्र निषेध करतो. भुयार हे जिल्ह्याबाहेर जाणार नाही. कुणाची खुमखुमी असेल तर त्यांच्या अंगाला हात लावून दाखवा, अशा शब्दांत प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिलेल्या संदेशात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खा.सुरेश शेट्टी यांनी म्हटले आहे.

Web Title: Deveer Bhayari is a political victim!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.