रिद्धपूर तीर्थक्षेत्राचा विकास करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:11 AM2021-06-25T04:11:27+5:302021-06-25T04:11:27+5:30
जिल्ह्याला मोठा पौराणिक, ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्याचबरोबरच, निसर्गसौंदर्याने नटलेल्या विविध वनांचा जिल्ह्यात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटन विकासाची ...
जिल्ह्याला मोठा पौराणिक, ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्याचबरोबरच, निसर्गसौंदर्याने नटलेल्या विविध वनांचा जिल्ह्यात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटन विकासाची शक्यता आहे. त्या लक्षात घेऊनच प्राचीन वारसा जपणे व उत्कृष्ट पायाभूत सुविधांसह पर्यटनाला चालना देऊन रिद्धपूर तीर्थक्षेत्रात विविध ठिकाणी विकास आराखड्यातून कामे होत आहेत. मात्र, पर्यटन विकास महामंडळानेही यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना राबविल्या पाहिजेत. रिद्धपूर येथे विविध ठिकाणी स्थानिक पातळीवरील वैशिष्ट्ये अधोरेखित करणारे उपक्रम राबवावेत. तेथील विविध स्थळांचा विकास साधताना तेथील तलावाचेही सौंदर्यीकरण करावे. आराखड्यातील निधीबरोबरच पर्यटन निधीही उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी अखिल महानुभाव परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेश ठाकरे यांनी केली आहे.
रिद्धपूर तीर्थक्षेत्रकारिता भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी अखिल महानुभाव परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेश ठाकरे, रूपेश वाळके, नितीन लुंगे, सुधाकर कोठीकर, प्रदीप टेकाडे, विनोद लुंगे, आशिष वानखडे, सुरेश मडघे, विनोद कोहळे, बाबुराव कडू, गोपाल लुंगे, सुनील शेळके, राजेंद्र देशमुख यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर, आ देवेंद्र भुयार यांच्याकडे केली आहे.
महानुभावपंथाची काशी, गोविंदप्रभू यांचे देवस्थान व मराठी भाषेसाठीचे माहात्म्य स्थळ असलेल्या श्री रिद्धपूर क्षेत्राच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा राबविण्यात यावा, रिद्धपूर विकास आराखडा सर्वांगीण व सविस्तर झाला पाहिजे. वरूड- मोर्शी तालुक्यातील महानुभावपंथाच्या सर्व ठिकाणांचा विकास व्हावा, या हेतूने समग्र तपशिलासह आराखडा तयार करावा, परिसरातील तळे, नैसर्गिक उद्याने, मोकळ्या जागांचा विकास केल्यास पर्यटकांसाठी नानाविध आकर्षण स्थळे निर्माण होतील व पर्यटनाला चालना मिळेल, असे मत अखिल महानुभाव परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेश ठाकरे यांनी मांडले.