संत्रा उत्पादकांचा विकास शून्य

By admin | Published: January 24, 2016 12:15 AM2016-01-24T00:15:43+5:302016-01-24T00:15:43+5:30

प्रक्रिया उद्योग नाही : जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांची व्यथा

Development of orange growers | संत्रा उत्पादकांचा विकास शून्य

संत्रा उत्पादकांचा विकास शून्य

Next


अचलपूर : जिल्ह्यात वरुडनंतर अचलपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. यंदा संत्राफळांचे उत्पादन व विक्रीस ग्रहण लागले होते. संत्र्याला गळती लागल्याने कोट्यवधींचा संत्रा मातीमोल झाला. तालुक्यात संत्रा प्रक्रिया उद्योग नसल्याने संत्रा उत्पादकांना दरवर्षी फटका बसत आहे.
वरुड आणि मोर्शी तालुक्या प्रमाणे अचलपूर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात संत्राफळांचे उत्पादन घेतले जाते. ५४११६ पैकी १० हजार ४१९ हेक्टर क्षेत्र संत्रापिकाखाली आहे. तालुक्यातील एकूण १६ हजार ७२० हेक्टरचे सिंचन होते. त्यासाठी ८११३ विहिरी आहेत. यंदा सतत गळतीमुळे संत्रा ५० टक्के राहिला. त्यातच संत्र्याला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला होता. व्यापारी बागेतील मोठ्या चांगल्या फळांची मोजणी करायचे. त्यामुळे बारीक संत्रा त्याच ठिकाणी तोडून फेकला जात होता. त्यामुळे संत्रा मंडई परिसरात सडलेल्या संत्र्याचे ढिग असायचे यावेळी संत्रा उत्पादकांना फार मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.
अचलपूर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ६४६३० हेक्टर आहे. त्यापैकी ५४११६ हेक्टर जमीन वाहितीखाली आहे. यात ३३ टक्के जमिन मध्यम तर ३५ टक्के भारी स्वरुपाची आहे. तालुक्याची लोकसंख्या ३ लाख ४ हजारांच्या वर असून खातेदार ९८ हजार ९१३ आहेत.
सिंचनाची मुबलक सोयी असूून पाणी साठाही भरपूर आहे. त्यामुळे पपई, सीताफळ, डाळिंब, पेरू, आवळा, भाजीपाला आदी फळ व पालेभाज्यांची पिके घेतली जातात. तर २,०४३ हेक्टरवर ज्यावारी सोयाबीन १७,११० हेक्टरवर कपाशी, ६१२६ हेक्टरवर तूर घेण्यात आली.
तालुक्यात संत्रा पिकांचे महत्तम पीक येऊन भाव व मागणी नसल्याने उत्पादकांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी अडचणीत आला असून संत्रा प्रक्रिया उद्योग किंवा संत्राफळ साठवण्यासाठी शितगृह आणण्यासाठी लोकप्रतिनिधी अपयशी ठरत आहे. (शहर प्रतिनिधी)

संत्र्यावर रोगांचे आक्रमण
यंदा संत्रा उत्पादक आर्थिकदृष्ट्या खचला. संत्र्यावर हवामानातील बदलामुळे कोळशी, बुरशी, सायटरसीला यामुळे फळांवर कंठावायबार या रोगामुळे फळांवर परिणाम झाला. संत्र्याला नको तेवढी गळती लागली. त्याचप्रमाणे शासनाच्या तुघलकी कारभारामुळे संत्रा निर्यातीवर विपरीत परिणाम झाला, अशी प्रतिक्रिया नारायणराव मेटकर, शंकरराव भिडकर, सुदेश भाकरे, मणिराम दहीकर, राजाभाऊ शिंदे, श्रीधर क्षीरसागर यांनी दिली आहे.

संत्रा हे नाशवंत फळ आहे. अचलपूर तालुक्यातून दिल्ली, मुंबई, हरियाणा, पंजाबपर्यंत संत्रा पाठविला जातो. वाहतूक करताना संत्रा सडतो. यंदा संत्र्याचे उत्पादन होऊनही गळती लागल्याने त्याचा फटका व्यापाऱ्यांनाही बसला आता तर विदेशातही संत्र्याला मागणी होऊ लागली आहे. वाहतूक खर्च लक्षात घेता शेतकरी व व्यापारी दोघांच्याही हिताचे नाही.
-अजय लकडे,
संत्रा उत्पादक मंडई.

यंदा संत्र्याला गळती मोठ्या प्रमाणात होती. नैसर्गिक आपत्तीही होती. यामुळे संत्रा पिकावर परिणाम झाला. तालुक्यातील शेतात आमच्या पथकाने जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तज्ज्ञ बोलावून त्यावर उपचार केले. बहुतांश गावांत मार्गदर्शन शिबिरेही घेतली.
- एस.बी. जाधव,
तालुका कृषी अधिकारी.

Web Title: Development of orange growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.