लोकसहभागातून साकारतो विकास
By admin | Published: March 23, 2016 12:32 AM2016-03-23T00:32:09+5:302016-03-23T00:32:09+5:30
लोकसभागातूनच विकास आकार घेतो. त्यामुळे विकासकामे करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्यासोबतच समन्वय ठेवावा.
यशोमती ठाकूर : कौंडण्यपूरला पांदण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
तिवसा : लोकसभागातूनच विकास आकार घेतो. त्यामुळे विकासकामे करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्यासोबतच समन्वय ठेवावा. विकास काम करणे ही जबाबदारी केवळ लोकप्रतिनिधींची आहे. ही भावना व्यवहार्य नाही, असे प्रतिपादन आमदार यशोमती ठाकूर यांनी केले. त्या तालुक्यातील श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील पांदण रस्त्याच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर मंगेश भगोले, भारत ढोने, लोकेश केने, रितेश पांडव, देवराव खडसे, शेषराव राठोड, सुरेश धत्तणे, राजू वेरुळकर, एसडीओ शिवाजी जगताप, तहसीलदार राम लंके आदी उपस्थित होते. लोकसहभागातून पाणंद रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. त्यामुळे विकास कामात लोकसहभाग महत्त्वाचा ठरतो, असे सांगून त्या म्हणाल्या की श्रद्धा आणि धर्म याबाबत सर्वांना स्वातंत्र्य आहे. यात कोणी कोणावर बळजबरी करू शकत नाही. घटनेने सर्वांना समसमान अधिकार बहाल केले आहे. त्यामुळे आपले हक्क, अधिकार याबाबत दक्ष असले पाहिजे. परंतु यात जर कोणी खोडा घालत असेल तर त्याचा जाब विचारण्याची तयारी असावी. श्रीक्षेत्र कौंडण्यपूर विकासासाठी विकास आराखडा मंजूर झाला असून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे आकार घेत आहे. परंतु संध्याचे सरकार केवळ घोषणा करण्यातच धन्यता मानत आहे. (प्रतिनिधी)