देवेंद्र भुयार उवाच; मुलगी जर दिसायला चांगली असेल तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 12:32 PM2024-10-03T12:32:52+5:302024-10-03T12:34:14+5:30

Amravati : जाहीर सभेत वक्तव्य केल्याबाबत आश्चर्याचा धक्का

Devendra Bhuyar viral remarks on women; If a girl is good looking... | देवेंद्र भुयार उवाच; मुलगी जर दिसायला चांगली असेल तर...

Devendra Bhuyar viral remarks on women; If a girl is good looking...

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
लग्नाला पोरगी जर पाहिजे असेल, तर पोरा नोकरीवाला पाहिजे. पोरगी स्मार्ट तुमच्या माझ्यासारख्या पोरांना भेटत नाही, नोकरीवाल्यांना भेटते. दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते, ज्यांचा पानठेला आहे, धंदा, किराणा दुकान आहे, अशा माणसांना दोन नंबरची पोरगी भेटते आणि तीन नंबरचा गाळ राहिलेली पोरगी शेतकऱ्यांच्या पोरांना भेटते. शेतकऱ्यांच्या पोरांचं काही खरं राहिले नाही, अशा वादग्रस्त विधानाचा जाहीर सभेतील एक व्हिडीओ बुधवारी आमदार देवेंद्र भुयार यांचा व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यातही प्रसारमाध्यमांमध्ये हे वृत्त झळकल्याने भुयार चर्चेत आले.


जन्माला येणारं जे लेकरू आहे, ते हे बाळ निघत राहते, तर माय इल्लू पिल्लू त्याच्यापोटी वानराचे पिल्लू असाच हा कार्यक्रम सगळा, असेही आमदार भुयार म्हणाले. त्यांच्या या विधानावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. एका बाजूला महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, तर दुसरीकडे आमदारांच्या विधानामुळे आता टीका होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार भुयार यांचे हे विधान विरोधकांना आयते कोलीत मिळाल्याचे मतदारसंघासह राजकीय बोलले जात आहे. 


महिला उपभोगाचे साधन आहे का? यशोमती ठाकूर
अजित पवार आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावे, महिलांचे असे वर्गीकरण कोणीही खपवून घेणार नाही. तुम्हाला संसार आणि समाज धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. महिलांच्या मतांसाठी तुम्ही जीवाचं रान करता, दुसरीकडे वर्गीकरण करून महिलांचा अपमान करताय, त्यामुळे तुमची मानसिकता काय, ते समजत आहे. महिला काय उपभोगाचे साधन आहेत का, अशी टीकावजा प्रतिक्रिया आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली. 


ते विधान २०१९ मधील तेव्हा वस्तूस्थिती मांडली 
"मध्य प्रदेशात २०१९ मध्ये एका जाहीर कार्यक्रमात आयोजकांनी दिलेल्या 'त्या' विषयावर केलेले हे विधान आहे. या विधानाचा आता कोठेही संबंध नाही. महिलांचा अपमान किंवा टीका करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यावेळी पोरांना लग्नाची मुलगी मिळत नव्हती, म्हणून तेव्हाची वस्तुस्थिती मांडली. हा विरोधकांचा मला बदनाम करण्याचा राजकीय डाव आहे." 
- देवेंद्र भुयार, आमदार मोर्शी.

Web Title: Devendra Bhuyar viral remarks on women; If a girl is good looking...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.