विदर्भाचे प्रतिपंढरपूर असलेल्या कौंडण्यपुरात भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 11:30 AM2019-07-13T11:30:36+5:302019-07-13T11:32:35+5:30

विदर्भाचे पंढरपूर तथा रुक्मिणीचे माहेर तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त सुमारे ४० हजार भाविकांनी सायंकाळपर्यंत दर्शन घेतले.

Devotees' gathered in Kandanaypur | विदर्भाचे प्रतिपंढरपूर असलेल्या कौंडण्यपुरात भाविकांची मांदियाळी

विदर्भाचे प्रतिपंढरपूर असलेल्या कौंडण्यपुरात भाविकांची मांदियाळी

googlenewsNext
ठळक मुद्देरुक्मिणीच्या माहेरात दर्शनाची रांगआषाढी एकादशीनिमित्त पंढरीचे स्वरूप

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विदर्भाचे पंढरपूर तथा रुक्मिणीचे माहेर तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त सुमारे ४० हजार भाविकांनी सायंकाळपर्यंत दर्शन घेतले. आषाढी एकादशीनिमित्त वर्धा नदीच्या तीरावर असलेल्या या श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानला पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
कौंडण्यपूर येथून पंढरपूरला पायी जाणारी सर्वात पहिली पालखी आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येथून विठ्ठलाच्या भूमीत दिंडीसोबत जातात. याशिवाय कौंडण्यपूर येथेही तीन दिवस सतत गर्दी राहते. काही कारणास्तव पंढरपूरला जाता न आलेले भाविक प्रतिपंढरपुरात दर्शनाला गर्दी करतात.

शासनाच्या प्रतिनिधींकडून पूजन
आषाढी एकादशीच्या महापूजेचा मान आर्वी येथील सत्यनारायण चांडक यांना सपत्नीक मिळाला. तिवस्याचे तहसीलदार रवि महाले, नायब तहसीलदार दत्ता पंधरे, मंडळ अधिकारी नंदकिशोर मधापुरे यांनीही सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीचे पूजन केले. या पूजेला पुजारी, देवस्थानचे कर्मचारी, विश्वस्त, भाविक उपस्थित होते.

४० हजार भविकांचे दर्शन
श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानात सकाळी सहापासून दर्शनासाठी रांग लागली होती. सायंकाळपर्यंत ४० हजारांवर भाविकांनी दर्शन घेतले. तत्पूर्वी, काही भाविकांनी वर्धा नदीत अभ्यंगस्नान केले. विठुरायाचा गजर सर्वत्र होता.

चोख बंदोबस्त
श्री विठ्ठल रुख्मिणी देवस्थानचे अध्यक्ष नामदेव अमाळकर, सचिव सदानंद साधू, विश्वस्त अतुल ठाकरे, दिलीप मेहकर यांनी मंदिर व नदीतीरावर सुरक्षा व्यवस्था केली होती. याशिवाय कुºहा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल जाधव, कॉन्स्टेबल हनुमानसिंह ठाकूरसह एकूण ५० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

दहीहंडी १७ जुलैला
पाडव्याला १७ जुलै रोजी काल्याच्या कीर्तनानंतर ४.३० वाजता गोकुळपुरीत होणाºया दहीहंडीने महोत्सवाचे समापन होईल. कृषिमंत्री अनिल बोंडे, खा. नवनीत राणा, आ. यशोमती ठाकूर, खा. रामदास तडस, आ. रवि राणा यांच्यासह सुमारे ३० हजार भाविक यावेळी उपस्थित राहतील.

Web Title: Devotees' gathered in Kandanaypur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.