भाविकांना टाळमृदंगाच्या निनादाची आस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:10 AM2021-07-11T04:10:48+5:302021-07-11T04:10:48+5:30
अमरावती : कोरोनाकाळात भाविकांची गर्दी व त्यातून पाहायला लावणारा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध लादले गेले. श्रावणात ...
अमरावती : कोरोनाकाळात भाविकांची गर्दी व त्यातून पाहायला लावणारा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध लादले गेले. श्रावणात भक्तीचा महापूर येत असतो. मात्र, यंदाही श्रावणातील भाविकांच्या उत्साहावर पाणी पडणार आहे. मंदिर अद्याप लॉकच असल्यामुळे हरिपाठ, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे सायंकाळी मंदिरातील टाळ-मृदंगाचा नीनादही लॉकच आहे. भक्तिमय सुरकुत्या भाविकांना आस लागलेली असून, हरिनामाचा जागर कधी सुरू होणार याचा वेध लागला आहे.
राज्यासह जिल्ह्यात सुमारे दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पहिल्या लाटेतून सावरत नाही तोपर्यंत दुसऱ्या लाटेने थैमान घातले. त्यामुळे सामाजिक धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध आले. जिल्ह्यातील सर्व मंदिरे बंदच आहेत. पहिली लाट ओसल्यानंतर सर्व क्षेत्र खुले झाल्यावरही गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिरे लॉकच आहेत. जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा बरोबरच विशेष धार्मिक पार्श्वभूमी आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी प्रसिद्ध व जागृत देवस्थाने आहेत. या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी नेहमीच रेलचेल असते. मात्र, कोरोनामुळे शहरासह ग्रामीण भागातील मंदिरे अनलॉकचा काही काळ वगळता वर्षभर बंदच आहेत. मंदिरात होणारे धार्मिक कार्यक्रमांनाही निर्बंध लावण्यात आले आहेत. श्रावण महिन्याला अजून अवधी आहे. मात्र, या महिन्यात धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असते. अखंड हरिनाम सप्ताह कोरोनामुळे होत नाहीत. मंदिरात सकाळी काकड आरती, पूजा तर सायंकाळी हरिपाठ कीर्तन भजन होत असते. त्यांच्या सोबतीला टाळ मृदंग, पखवाज यांचा नाद घुमतो. कोरोना संकटामुळे सर्व मंदिर व धार्मिक कार्यक्रम बंद असल्याने टाळ-मृदंगाचा निनाद लॉकडाऊनच आहे. फारशा कौटुंबिक जबाबदाऱ्या नसल्यामुळे बहुतेक ज्येष्ठ मंडळी मंदिरामधील भजन कीर्तनात सहभागी होतात. कोरोनामध्ये कार्यक्रम होत नसल्याने ज्येष्ठ मंडळीचे व्यक्तिस्वातंत्र्याचे व्यासपीठ दुरावल्याचे दिसून येत आहे.
बॉक्स
पुजारी वर्गाचे अर्थकारण ठप्प
सर्व मंदिरांमध्ये देखभाल व पूजाअर्चा करण्याचे काम पुजारी करत असतात. प्रत्येक मंदिराच्या पुजाऱ्याच्या एकापेक्षा जास्त संख्या असल्याने प्रत्येक पुजाऱ्याला मंदिर समितीकडून मानधनतेचा इशारा दिला जातो. कोरोनामुळे वर्षभर मंदिर बंद असल्याने भाविकांच्या पूजा, होमहवनला अभिषेक दर्शनाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न बंदमुळे उत्पन्नाचे स्रोत लॉक असल्याने पुजारी वर्गाचे अर्थकारण ठप्प झाले आहे.