घुईखेडमध्ये भक्तीचा जागर

By admin | Published: February 8, 2017 12:23 AM2017-02-08T00:23:38+5:302017-02-08T00:23:38+5:30

१३ व्या शतकातील श्री.संत बेंडोजी महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन लाखो भाविकांनी घेतले. शनिवारच्या भव्यदिव्य दहिहांडी महोत्सवात लाखो भक्त सहभागी झाले होते.

Devotional Jagar in Ghoikhed | घुईखेडमध्ये भक्तीचा जागर

घुईखेडमध्ये भक्तीचा जागर

Next

संजीवन समाधी सोहळा : बेंडोजी महाराजांचा जयघोष, ९७ दिंड्या दाखल
चांदूररेल्वे : १३ व्या शतकातील श्री.संत बेंडोजी महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन लाखो भाविकांनी घेतले. शनिवारच्या भव्यदिव्य दहिहांडी महोत्सवात लाखो भक्त सहभागी झाले होते. श्री संत बेंडोजी महाराजांच्या पालखी सोहळ्यात राज्यातील ९७ दिंड्या सहभागी झाल्या होत्या. लेझीम, बँड, भजने व हरिनामाच्या गजराने संपूर्ण घुईखेड नगरी दुमदुमली होती.
तालुक्यातील घुईखेड येथील श्री.संत बेंडोजी महाराजाच्या संजीवन समाधी महोत्सवाला २८ जानेवारीला प्रारंभ झाला. तिर्थ व कलश स्थापना करून श्री संत बेंडोजी महाराजांचा लघु रूद्राभिषेक संस्थानचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर यांच्या हस्ते झाला. २८ जानेवारी ते ४ फेब्रुवारी सलग सात दिवस हभप गोदावरीबाई बंड यांनी आपल्या अमृतवाणीतुन सुंदर भागवत प्रवचण केले.
काल्याचे किर्तन व महाप्रसाद
शनिवारी सकाळी श्री.संत बेंडोजी महाराजांची सामूहिक आरती झाली. ४ पेष्ठब्रुवारीला हभप उमेश महाराज जाधव (आळंदी)यांचे काल्याचे किर्तन झाले. श्री संत बेंडोजी महाराज यांच्या पालखी सोहळ्याला सुरूवात झाली. यामध्ये घुईखेड येथील बेंडोजी बाबा विद्यालयाच्या दिंडीसह नगर, बिड, वर्धा, नांदेड, यवतमाळसह राज्यातील महिला व पुरूषांच्या ९७ दिंड्या सहभागी झाल्या होत्या. लेझीम, बँड व भजनाच्या गजरात, हा ऐतिहासिक पालखी सोहळा संस्थानच्या शेतामध्ये पोहोचला. परंपरेनुसार शंभर वर्षांपूर्वीच्या चिंचीच्या झाडाजवळ दहिहांडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या दहीहांडीचा लाभ लाखो भाविक भक्तांनी घेतला. दंहिहांडीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला, तर शनिवारी रात्री विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा होणार आहे. या कार्यक्रमाला अमरावती जि.प.सदस्य प्रविणभाऊ घुईखेडकर, संस्थान अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, कोषाध्यक्ष दिनकरराव घुईखेडकर, सचिव बाळासाहेब देशमुख, सदस्य विजय घुईखेडकर, विवेक घुईखेडकर, शशिकांत चौधरी यासह गावकरी मंडळी व लाखो भाविक सामिल झाले होते. यात्रेत आकाश पाळणा, टुरींग टॉकीज यासह लोकपयोगी विविध साहित्यांची दुकाने सजली होती.

पोलिसांचा बंदोबस्त
या संपूर्ण सोहळ्याचा तळेगाव दशासरचे ठाणेदार ए. डी. सुराडकर, दुय्यम ठाणेदार शिवाजी राठोड, बिट जमादार वसंत राठोड व सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. घुईखेड यात्रेसाठी चांदूर रेल्वे आगाराचे आगार व्यवस्थापक धजेकर यांनी जादा एसटी बसेसची व्यवस्था केली होती.

Web Title: Devotional Jagar in Ghoikhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.