धामणगावचा दंड पोहोचलाय देशाच्या कानाकोपऱ्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 01:48 PM2019-01-08T13:48:35+5:302019-01-08T13:50:29+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत भुजदंड तथा पथसंचलन करताना खांद्यावर घेतला जाणारा दंड (काठी) जिल्यातील धामणगावात तयार केला जातो. गुजरात, आंध्र प्रदेशासह देशभरात त्याची ओळख झाली आहे.
मोहन राऊत
अमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत भुजदंड तथा पथसंचलन करताना खांद्यावर घेतला जाणारा दंड (काठी) जिल्यातील धामणगावात तयार केला जातो. गुजरात, आंध्र प्रदेशासह देशभरात त्याची ओळख झाली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत दंड (काठी) ला सर्वात महत्त्व आहे. खाकी गणवेश, काळी टोपी, पट्टा, जोडे-मोजे या वेशभूषेला परिपूर्णता येते ती दंडामुळे. या दंडाची निर्मिती मागील अनेक वर्षांपासून धामणगाव शहरातील तहसील कार्यालयासमोर करण्यात येते.
बांबूच्या बुंध्यातून दंडाची निर्मिती
शेतातील धुºयावर असलेल्या भरीव बांबूचे बुंधे चार ते पाच हजार रुपयांत कंत्राटी पद्धतीने शेतकºयांकडून खरेदी करून दंडाला आकार देण्याचे काम या क्षेत्रात निष्णात असलेले कारागीर करतात. त्यामध्ये प्रथम या दंडाला सरळ करण्यासाठी जवस तथा सरकीचे तेल लावण्यात येते. यानंतर विस्तवात भाजले जाते. त्यानंतर पाहिजे त्या प्रमाणात सरळ आकार दिला जातो. एक दंड (काठी) तयार करण्यास एक ते दीड तास लागत असल्याची माहिती या कारागिरांनी दिली. ७० ते ८० रुपयांत एका दंडाची विक्री करण्यात येते
गुजरात, आंध्र प्रदेशात मागणी
देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. ६८ संघशाखांचे गाव असलेल्या धामणगावचे नागपूर स्थित मुख्यालयाशी दादाराव अडसड यांच्या काळापासून स्नेहबंध आजही कायम आहेत. त्यामुळे येथील दंडाला गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये विजयादशमी उत्सव तसेच अनेक वेळा मागणी नोंदविली जाते.
सरसंघचालकांचा दंड धामणगावातूनच
सरसंघचालक मोहन भागवत हे धामणगाव येथून तयार केलेला दंड (काठी) शाखेत वापरत असल्याची माहिती मिळाली आहे. विभागीय संघचालक चंद्रशेखर राठी हे धामणगाव शहरातील रहिवासी आहेत. त्यांच्यामार्फत येथून हा दंड खरेदी केला जातो.
तळेगावच्या ऐतिहासिक पटात येथील काठीची मागणी
कृषिसाहित्य विक्रीचा प्रसिद्ध बाजार असलेल्या तळेगाव दशासर येथील शंकरपटाच्या यात्रेत धामणगाव येथे तयार केलेल्या काठ्यांची सर्वात जास्त विक्री केली जाते. शेतीच्या सर्व कामांत वापरल्या जाणाºया या काठ्या अशोक भैसारे, दिलीप भैसारे, रमेश भैसारे, यादव बोधिले, जीवन साखरे, श्यामराव नंदेश्वर हे करतात.
संघशाखेमध्ये वापरण्यात येणारे दंड (काठी) धामणगाव येथूनच खरेदी केले जातात. आम्हीसुद्धा स्थानिक स्तरावर निर्मित दंड वापरतो.
- गोपाल भैया, विदर्भ विद्यार्थी प्रांत प्रमुख
एक दंड (काठी) तया
र करण्यास दोन ते तीन तास लागतात. मोठ्या कौशल्याने ही काठी तयार करावी लागते. संघाच्या शाखेसाठी या दंडाची मागणी होते.
- शेषराव नंदेश्वर, धामणगाव रेल्वे