मेळघाटच्या जंगलात धामणची प्रणयक्रीडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:17 AM2021-06-16T04:17:36+5:302021-06-16T04:17:36+5:30

फोटो पी १४ नागीन परतवाडा (अमरावती) : वेळ दुपारी ३ वाजताची. पावसाची भीती असल्याने बाहेरगावी जाण्यासाठी नागरिकांची व रस्त्यावरून ...

Dhaman's love game in the forest of Melghat | मेळघाटच्या जंगलात धामणची प्रणयक्रीडा

मेळघाटच्या जंगलात धामणची प्रणयक्रीडा

Next

फोटो पी १४ नागीन

परतवाडा (अमरावती) : वेळ दुपारी ३ वाजताची. पावसाची भीती असल्याने बाहेरगावी जाण्यासाठी नागरिकांची व रस्त्यावरून दुचाकी-चारचाकीने वर्दळ सुरू होती. रस्त्याच्या अगदी कडेला बिनविषारी असलेल्या अंदाजे आठ फुटाच्या धामणाची प्रणयक्रीडा पाहून रविवारी नागरिकही थबकले. परतवाडा, सलोना, चिखलदरा मार्गावरील घटना अनेकांनी मोबाईलमध्ये कैद केली.

मेळघाटच्या जंगलात कोब्रा, मण्यार, घोणस, फुरसे हे विषारी, तर धामण, कवड्या गवत्या, रेसर (धुलनागीण) अशा अनेक प्रकारचे बिनविषारी सापाच्या प्रजाती आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून धामण सह इतर काही सरपटणाऱ्या प्राण्यांचा मीलन सुरू होतो तो जून महिन्यापर्यंत. रविवारी चिखलदारा सलोना मार्गावर रस्त्याच्या कडेला चार ते पाच फुटांपर्यंत उंच उडणाऱ्या धामणची प्रणयक्रीडा नागरिकांना थांबण्यास भाग पाडणारी ठरली. परिसरातील गुराखी उभे असल्याचे पाहून चिखलदर व परतवाडा जाणारे नागरिकही काहीकाळ तेथे थबकले. नागरिकांचा हल्लकल्लोळ पाहून सलोना येथील सामाजिक कार्यकर्ते कैलाश हरसुले, राजेश कास्‍देकर, अर्जुन कासदेकर, दीपक शेळके, नामदेव गायन आदींनी नागरिकांचा हल्लकल्लोळ न करता शांत बघून निघून जाण्याचा सल्ला दिला.

बॉक्स

मिलापसाठी विशिष्ट गंध सोडतात

प्रणय क्रीडा फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होत असली तरी धामण नर-मादी विशिष्ट प्रकारचा शरीरातून एक विशिष्ट गंध सोडतात. त्यातून त्यांचा मिलाप होत असून, नाग-नागीणचा मिलाप सहसा दिसतच नसल्याचे मेळघाटातील सेमाडोह येथील सर्पमित्र भोला कास्देकर यांनी सांगितले.

Web Title: Dhaman's love game in the forest of Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.