चौकाचौकात ग्रामपंचायत निवडणुकीची धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:14 AM2021-01-03T04:14:29+5:302021-01-03T04:14:29+5:30
तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. इच्छुक तयारीला लागले आहेत. उमेदवारी अर्जदेखील भरून झाले. आता आपली भावकी किती, ...
तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. इच्छुक तयारीला लागले आहेत. उमेदवारी अर्जदेखील भरून झाले. आता आपली भावकी किती, आपल्या बाजूने किती जण आहेत, याची आकडेमोड सुरू झाली आहे. काही जण स्वत: रिंगणात न उतरता पडद्याआडून रिमोट कंट्रोल हातात ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांत गावागावांतील चित्र स्पष्ट होणार आहे. एकूणच ऐन थंडीत आता गावातील राजकीय वातावरण गरम झाले आहे. या निवडणुकीत तालुकास्तरावरील अनेक दिग्गज नेत्यांच्या गावात निवडणुका होत आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. आता आपआपल्या गावाची सत्ता राखण्यावर भर दिला जात असून, मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सत्तेत असलेले नेते आपली पुन्हा मिळावी म्हणून, तर विरोधी बाकावर असणारे सत्तेत येण्याकरिता रात्रंदिवस मेहनत केली जाणार आहे. आचारसंहिता लागू झाली आहे. आता पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा गावागावांतून विकासाच्या गप्पा सुरू झाल्या आहेत.
----------------