झेडपीतून थेट ग्रामविकास सचिवांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 11:45 PM2018-05-08T23:45:15+5:302018-05-08T23:45:15+5:30
जिल्हा परिषदेतील काही वर्षांपासून बंद पडलेली व्हिडीओ कॉन्फरन्स सेवा नव्याने कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय व विभागीय आयुक्त कार्यालयातून व्हिसीचा संवाद आता झेडपीतून साधण्याचा मार्ग मोकळा झाला. ही सुविधा सुरू होताच सोमवार, ७ मे रोजी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी राज्याच्या ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्याशी विविध मुद्यांवर संवाद साधला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेतील काही वर्षांपासून बंद पडलेली व्हिडीओ कॉन्फरन्स सेवा नव्याने कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय व विभागीय आयुक्त कार्यालयातून व्हिसीचा संवाद आता झेडपीतून साधण्याचा मार्ग मोकळा झाला. ही सुविधा सुरू होताच सोमवार, ७ मे रोजी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी राज्याच्या ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्याशी विविध मुद्यांवर संवाद साधला.
ग्रामविकास सचिवांनी मुख्यकार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, मुख्य व लेखा अधिकारी रवींद्र येवले, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पंचायत) दिलीप मानकर, सामान्य प्रशासनचे नारायण सानप आदी अधिकाऱ्यांशी व्हीसीद्वारे संवाद साधला. लायबिलिटी रजिस्टर सिस्टीम, आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पांतर्गत रोजगार हमी योजनेसंदर्भात नवीन शासन निर्णय, अस्मिता योजनेबाबत व केडर मॅनेजमेंट सिस्टिम आदी विषयांची माहिती ग्रामविकास सचिवांनी जाणून घेतली. नव्याने कार्यान्वित केलेल्या व्हिडीओ कॉन्फरंसिंगवरील झेडपीतील हा पहिलाच संवाद ठरला.
आतापर्यंत जिल्हा परिषदेत व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधा बंद होती. ती नव्याने सुरू करण्यात आली. त्यामुळे इतरत्र न जाता मुख्यालयातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सवर संवाद साधणे सोयीचे झाले.
- मनीषा खत्री,
मुख्य कार्याकारी अधिकारी