भाऊ आपल्या वाहनाला स्टिकर लावले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:14 AM2021-07-31T04:14:09+5:302021-07-31T04:14:09+5:30

संदीप मानकर/अमरावती : केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक निर्देशानुसार इंधनानुसार वाहनांना विशिष्ट रंगाचे स्टिकर लावावे लागणार ...

Did the brother put a sticker on his vehicle? | भाऊ आपल्या वाहनाला स्टिकर लावले का?

भाऊ आपल्या वाहनाला स्टिकर लावले का?

Next

संदीप मानकर/अमरावती : केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक निर्देशानुसार इंधनानुसार वाहनांना विशिष्ट रंगाचे स्टिकर लावावे लागणार आहे. त्यासाठी प्रारुभ स्वरूप अधिसूचना जारी झाली असली तरी अंमलबजावणीची अधिसूचना अद्याप निघालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात अंमलबजावणी झाली नसली तरी भविष्यात पेट्रोलसाठी निळे, तर डिझेल वाहनांसाठी नारंगी स्टिकर लावले जाणार असल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक वाहनाला विशिष्ट प्रकारचे स्टिकर लागणार आहे. वाहन निर्माता कंपनी किंवा डिलर सदर वाहनाची विक्री करतानाच सदर स्टिकर संबंधित वाहनांना लावून देणार आहे. स्टिकर लावल्याशिवाय आरटीओत नवीन वाहनांची नोंदणीच होणार नसल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राज बागरी यांनी स्पष्ट केले. पेट्रोल व सीएनजी वाहनाकरिता फिकट निळा, तर ईलेक्ट्रिक व हायब्रीड वाहनाकरिता हिरवा व झिझेल वाहनाकरिता नारंगी रंगाचे स्टिकर असणार आहेत.

जिल्ह्यातील एकूण वाहने-

पेट्रोलवर चालणारी वाहने- ५,६३४०७

झिझेलवर चालणारी वाहने- ६५,४२७

इलेक्ट्रीक वाहने- ५८४

सीएनजी वाहने- ००

एलपीजी/ पेट्रोल- ६९५५

बॉक्स:

कोणत्या वाहनांसाठी कुठल्या रंगाचे स्टिकर

पेट्रोल व सीएनजी वाहनाकरीता फिकट निळा, ईलेक्ट्रिक व हायब्रीड वाहनाकरिता हिरवा तर डिझेल वाहनांकरिता नारंगी रंगाचे स्टिकर राहणार असल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बॉक्स

स्टिकर कुठे मिळणार?

वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनी किंवा विक्री करणारे डिलरलाच वाहन विक्री करताना सदर अधिसूचनेनुसार स्टिकर लावून द्यावे लागेल. त्याशिवाय आरटीओत नवीन वाहनांची नोंदणी होणार नाही. मात्र प्रारुभ अधिसूचना जारी झाली असली तरी अद्याप त्यासंदर्भात अंमलबजावणीचे आदेश नाहीत सदर आदेश देशात एकाच वेळीस लागू होतील, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

बॉक्स

स्टिकर नाही लावले तर ?

स्टिकर लावल्याशिवाय वाहन विक्री करता येणार नाही. आरटीओत त्याचे रजिस्ट्रेशन होणार नाही. स्टिकर नसल्यास मोटर वाहन कायद्याच्या कलम ३९ नुसार कारवाई केली जाईल असे आरटीओने स्पष्ट केले.

कोट

प्रारुभ स्वरूपाची अधिसूचना काढण्यात आली आहे. अंतिम अधिसूचना अद्याप निघाली नाही. याची अंमलबजावणीची झाली नसून, अधिसूचना निघाल्यानंतर स्टिकर लावण्यासंदर्भात संपूर्ण देशात एकाच वेळी नियम लागू होतील.

- राज बागरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती

Web Title: Did the brother put a sticker on his vehicle?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.