व्हीएमव्हीने यूजीसी मार्गदर्शक सूचना अंमलात आणल्या का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 11:14 PM2017-09-06T23:14:20+5:302017-09-06T23:14:44+5:30

अंबानगरीत शैक्षणिक क्षेत्रात अव्वलस्थानी असलेल्या शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेत रॅगींगचा अशोभनीय प्रकार घडला.

Did VMV implement the UGC Guideline? | व्हीएमव्हीने यूजीसी मार्गदर्शक सूचना अंमलात आणल्या का ?

व्हीएमव्हीने यूजीसी मार्गदर्शक सूचना अंमलात आणल्या का ?

googlenewsNext
ठळक मुद्देरॅगिंग प्रकरण : भारतीय जनता युवा मोर्चाचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अंबानगरीत शैक्षणिक क्षेत्रात अव्वलस्थानी असलेल्या शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेत रॅगींगचा अशोभनीय प्रकार घडला. रॅगीगचा या गंभीर प्रकाराबाबत व्हीएमव्हीने यूजीसी मार्गदर्शक सूचना अमलात आणल्या का, असा प्रश्न भाजयुमोने सहसंचालकांना निवेदनातून केला.
मंगळवारी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सोपान कनेरकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहसंचालक अर्चना नेरकर यांची भेट घेतली. यूजीसीने महाविद्यालयात अलार्म बसविण्याची सूचना केली, यासंबधाने महाविद्यालय व वसतीगृहाने किती कृती केली, असा सवाल त्यांनी केला. महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे, अ‍ॅन्टी रॅगिंग समिती, कार्यशाळा, रॅगींग रोखण्यासाठी सुचना संकेतस्थळावर देणे, नियमीत विद्यार्थ्यांशी संवाद साधने, माहिती पत्रकांचे वाटप करणे, वसतीगृह कॅन्टींग, शौचालय आणि इतर ठिकाणी अचानक तपासणी करणे आदी महत्त्वाची पावले व्हीएमव्ही प्रशासनाने महाविद्यालयात उचलली का, असा सवाल भाजयुमोने केला. तसेच यूजीसीने सांगितलेल्या सूचनांचे पालन न झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यूजीसीचे सचिन जयपाल संधू यांनी परिपत्रकातून दिल्याचे भाजयुमोने निवेदनात नमूद केले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना रॅगिंगसंबंधित तक्रार असल्यास विद्यार्थ्यांनी अ‍ॅन्टी रॅगिंग हेल्पलाईनवर १८००१८०५५२२ वर संपर्क साधा, असे आवाहन भाजयुमोने केले आहे.

Web Title: Did VMV implement the UGC Guideline?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.