एकाच व्यक्तीला कोरोना तपासणीचे वेगवेगळे अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:12 AM2021-05-24T04:12:37+5:302021-05-24T04:12:37+5:30
फोटो पी २४ वनोजा वनोजा बाग: अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भंडारज येथील एका तरूणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह व निगेटिव्ह असा ...
फोटो पी २४ वनोजा
वनोजा बाग: अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भंडारज येथील एका तरूणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह व निगेटिव्ह असा भिन्न आल्याने तालुका आरोग्य यंत्रणेवर प्रश्चिन्ह लागले आहे.
आरटीपीसीआर तपासणीचा अहवाल लवकर मिळत नसल्याने रुग्णाला चार चार दिवस वाट पाहावी लागते. नाईलाजास्तव रिपोर्टबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या भंडारज येथील तरुणाला तालूका वैद्यकीय कार्यालयात चक्क निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट देउन परत पाठविले. पण त्याच दिवशी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा गंभीर प्रकार उघड झाला.
भंडारज येथील एका तरूणाने १८ मे रोजी आरटीपिसीआर चाचणी केली. परंतु चाचणी करुन चार दिवस उलटले तरी आपला तपासणी अहवाल आला नसल्याने त्याने २१ मे रोजी तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयात विचारणा केली. त्याला तेथिल कर्मचार्याने निगेटिव्ह असल्याच्या तालुका वैद्यकीय अधिकारी यांची सही असलेला अहवाल दिला. परंतु त्याच व्यक्तीला २२ मे रोजी संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीच्या प्रयोगशाळेचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचा मॅसेज आला. बेजबाबदार पणे काम करणारे तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी झोपेत काम करतात असा प्रश्र्न निर्माण होतो. तालुका वैद्यकीय अधिकारी सुधिर डोंगरे यांच्यासोबत संपर्क केला असता त्यांनी समाधानकारक उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरे दिली.