व्यवहारांत अडचणी : चलन बंद होणार असल्याची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 05:00 AM2020-09-06T05:00:00+5:302020-09-06T05:00:00+5:30

नोटा बंद होणार असल्याच्या सर्वत्र ऐकू येणाऱ्या चर्चांमुळे आणि निर्माण झालेल्या धास्तीमुळे असे विपरीत परिणाम सर्वसामान्यांना सहन करावे लागत आहेत. चलन नाकारणे हा गुन्हा असताना राजरोसपणे अनेक प्रतिष्ठानांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा नाकारल्या जात आहेत. प्रशासनातील कुणाचेही चालताबोलता घडणाऱ्या या गुन्ह्यांवर नियंत्रण नाही. कुणाची तक्रार प्राप्त झाली नसल्यामुळे आम्ही काही करू शकणार नाही, असे गुळगुळीत उत्तर अधिकारी देतात.

Difficulties in transactions: Fear of currency closure | व्यवहारांत अडचणी : चलन बंद होणार असल्याची धास्ती

व्यवहारांत अडचणी : चलन बंद होणार असल्याची धास्ती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : २००० रुपयांच्या चलनी नोटा बंद होणार असल्याच्या चर्चा आणि त्यामुळे त्या नोटांचा व्यवहार करतानाची धास्ती अंबागरीतील व्यवहारांवर परिणाम करीत असल्याचे चित्र आहे.
नोटा बंद होणार असल्याची अधिकृत माहिती कुठेही जारी झाली नसली तरी दोन हजारांच्या चलनबंदीच्या भीतीमुळे डॉक्टरांसह अनेक व्यावसायिकदेखील नोटा स्वीकारण्यास नकार देत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
२००० रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याच्या माहितीचा सोशल मीडियावर अनियंत्रित प्रसार झाला. दोन हजार रुपयांच्या नोटा बरेच दिवसांपासून चलनातही दिसत नाहीत. ऑटो ट्रेलिंग मशीन (एटीएम)मध्येही या नोटा मुबलक प्रमाणात उपलब्ध नाहीत. मोजक्याच मशीन्समधून २००० रुपयांच्या नोटा मिळतात. त्यामुळे या नोटांसंबंधीच आणि शासन त्याबाबत काही निर्णय घेऊ शकेल यासंबंधाने जनतेत उत्सुकला वाढलेली आहे. हा गुलावी नोटांचा हा तुटवडा असताना शासनाने दोन हजार रुपयांच्या नोटा कमी छापल्याची माहिती उघड झाली. त्यामुळे 'डॉट्स कनेक्ट' करून लोक आणि व्यापारी वेगवेगळा अर्थ काढत आहेत.
दोन हजारांची नोट रुग्णालयातही चालेना !
गुलाबी नोटा बंद होणार असल्याची धास्ती इतकी की, परवा एका रुग्णालयात आयसीयूमधील रुग्णावर उपचार करण्यासाठी नातेवाईकाला काही रक्कम जमा करावी लागली. रुग्णालय व्यवस्थापकाने दोन हजारांच्या नोेटा स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली. दोन हजार रुपयांच्या नोटा आम्ही स्वीकारत नाही, असे थेट सांगण्यात आले. नातेवाईकाने सारे प्रयत्न केले; पण दोन हजारांची एक नोट बदललीच गेली नाही. तेवढी एक नोट स्वीकारा, अशी गळ त्याने घातल्यावर रुग्णालय प्रशासनाने ती एकच नोट असल्यामुळे स्वीकारत असल्याचे सांगून व्यवहार पूर्ण केला.
नोटा बंद होणार असल्याच्या सर्वत्र ऐकू येणाऱ्या चर्चांमुळे आणि निर्माण झालेल्या धास्तीमुळे असे विपरीत परिणाम सर्वसामान्यांना सहन करावे लागत आहेत. चलन नाकारणे हा गुन्हा असताना राजरोसपणे अनेक प्रतिष्ठानांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा नाकारल्या जात आहेत. प्रशासनातील कुणाचेही चालताबोलता घडणाऱ्या या गुन्ह्यांवर नियंत्रण नाही. कुणाची तक्रार प्राप्त झाली नसल्यामुळे आम्ही काही करू शकणार नाही, असे गुळगुळीत उत्तर अधिकारी देतात.
दोन हजारांच्या नोटा न स्वीकारण्याचे धोरण जसे काही मोठ्या प्रतिष्ठानांनी स्वीकारले आहे, तशीच लहान दुकानदारांनीही त्या नोटा स्वीकारण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. 'सुटे नसल्या'चे कारण त्यासाठी पुढे केले जात आहे.

आरबीआयने अधिकृत घोषणा केली नसली तरीही व्यावसायिकांत दोन हजार रुपयांच्या चलनबंदीचे भय आहे. सामान्य माणसाने दोन हजारांची नोट पोटाला चिमटा घेऊन सांभाळून ठेवली असेल आणि ऐनवेळी ती नाकारली जात असेल तर त्याने करायचे तरी काय ?
बंदीची अफवा
यासंबंधाने विविध तज्ज्ञांशी चर्चा केली असता चलनाबाबतचा सर्वंकष निर्णय रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या अख्यारितील असल्यामुळे कुठल्याही शक्यता वर्तविल्या जाऊ शकत नाही; तथापि दोन हजार रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याच्या अफवेचे व्यवहारांपवर परिणाम मात्र दिसू लागले आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. हे परिणाम अमरावती जिल्ह्यात आणि लगतच्या जिल्ह्यांतही अनुभवल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

लॉकडाऊनच्या काळात दोन हजार रुपांची नोट व्यावसायिकांनी स्वीकारली नाही. मोठी गोची त्यावेळी झाली.
- बाळासाहेब ढोक, नागरिक, अमरावती.

दोन हजार रुपयांच्या नोटा गेल्या कुठे ? एटीएममध्ये, व्यवहारांत त्या दिसत नाहीत. त्यामुळे साशंकत निर्माण होते. चर्चा होतात.
- प्रवीण देशमुख, अमरावती.

Web Title: Difficulties in transactions: Fear of currency closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.