दिगंबर डहाके अनंतात विलीन

By Admin | Published: June 4, 2016 12:05 AM2016-06-04T00:05:02+5:302016-06-04T00:05:02+5:30

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा विद्यमान नगरसेवक दिगंबर डहाके यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास अंतिम संस्कार करण्यात आले.

Digamer dahake merge in the infinity | दिगंबर डहाके अनंतात विलीन

दिगंबर डहाके अनंतात विलीन

googlenewsNext

जिल्हा हळहळला : पुतण्या, मुलीने दिला भडाग्नी
अमरावती : शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा विद्यमान नगरसेवक दिगंबर डहाके यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास अंतिम संस्कार करण्यात आले. पुतण्या रोहित आणि मुलगी समृद्धी हिने त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी जिल्ह्यातूनच नव्हे तर अकोल्यासह अन्य ठिकाणाहूनही आलेल्या शिवसैनिकांचे डोळे पाणावले.
गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास डहाके यांचे मुंबई स्थित कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात यकृताच्या आजाराने निधन झाले होते. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास डहाकेंचे पार्थिव भाजीबाजार स्थित त्यांच्या निवासस्थानी पोहोचले व शिवसैनिकांची एकच गर्दी झाली. आपल्या लाडक्या मित्राला, सहकाऱ्याला, मार्गदर्र्शकाला एकदा डोळे भरुन पाहण्यासाठी गेटच्या आतील भाग गर्दीने फुलला. गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, माजी मंत्री जगदीश गुप्ता, माजी आ.सुलभा खोडके, प्रदेश कॉँग्रेसचे सरसचिटणीस संजय खोडके, आ.अनिल बोंडे यांच्यासह अनेकांनी त्यांच्या कुटुंबीयाचे सांत्वन केले. दुपारी ३.३० च्या दरम्यान अंत्ययात्रा काढण्यात आली. यात हजारों शिवसैनिक, आमदार, विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, जि.प.सदस्य सहभागी झाले. जय भवानी-जय शिवाजी, दिगंबर डहाके अमर रहे अशा स्वरात अंत्ययात्रेत रुदन व्यक्त करण्यात आले.४ च्या सुमारास स्थानिक हिंदू स्मशानभूमित त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारानंतर श्रद्धांजली वाहण्यात आली. यात माजी मंत्री गुलाबराव गावंडे, माजी खा. अनंत गुढे, माजी आ. संजय बंड, आ. रवि राणा, सोमेश्वर पुसदकर, सुधीर सूर्यवंशी, बाळासाहेब हिंगणीकर, प्रवीण हरमकर, सुनील वऱ्हाडे, दिनेश बूब, यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महापालिकेतील आजी-माजी नगरसेवक, मनपातील अधिकारी, कर्मचारी, विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी, सर्वदूरचे शिवसैनिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Digamer dahake merge in the infinity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.