चांदूर रेल्वे येथे डिजिटल साक्षरता प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:22 AM2021-02-06T04:22:13+5:302021-02-06T04:22:13+5:30
चांदूर रेल्वे : दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व स्थानिक बँकांच्यावतीने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधीनुसार डिजिटल मोहीम ...
चांदूर रेल्वे : दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व स्थानिक बँकांच्यावतीने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधीनुसार डिजिटल मोहीम अंतर्गत नगर परिषदेच्या सभागृहात आर्थिक साक्षरता प्रशिक्षण विक्रेत्यांना देण्यात आले.नगराध्यक्ष शिट्टू सूर्यवंशी, मुख्याधिकारी मेघना वासनकर, राष्ट्रीयीकृत स्थानिक बँकांचे प्रतिनिधी वासनिक, डोळस, ओमसे या प्रसंगी उपस्थित होते. प्रारंभी कार्यक्रमाची माहिती प्रास्ताविकातून उज्वला पटले (पोकळे) यांनी दिली. विक्रेत्यांना दहा हजार रुपये कर्जवाटप असल्याचे जाहीर केले. त्यानुसार बँक ऑफ महाराष्ट्रने २६, बँक ऑफ इंडियाने ९१, सेंट्रल बँकेने ३९ व स्टेट बँकेने १२ अशा एकूण १६८ विक्रेत्यांना बँकेच्या क्यूआर कोडचे वाटप करण्यात आले. आपला रोजगार करताना कॅशलेस ऑनलाईन ॲपद्वारे आर्थिक व्यवहार कसे करावे, याची सविस्तर माहिती डोळस यांनी दिली. कार्यक्रमासाठी मातोश्री वस्तीतर संघाने परिश्रम घेतले. आभार स्वाती गणोरकर यांनी मानले.