अवघ्या दोनशे रुपयांत बनविला डिजिटल प्रोजेक्टर
By admin | Published: May 2, 2017 12:46 AM2017-05-02T00:46:41+5:302017-05-02T00:46:41+5:30
आजही अनेक गावांत विजेची, इंटरकोड व डिजिटल क्लासरूमची व्यवस्था नाही.
राज्यस्तरीय बहुमान : शिक्षकाने लढविली अनोखी शक्कल
अंजनगाव सुर्जी : आजही अनेक गावांत विजेची, इंटरकोड व डिजिटल क्लासरूमची व्यवस्था नाही. यामुळे येथील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र यावर तोडगा काढण्यासाठी संजय शेळके या शिक्षकाने शक्कल लढविली असून केवळ २०० रुपये खर्च करून डिजिटल प्रोजेक्टर तयार केला आहे.
आर्थिक दुर्बल अथवा अतिदुर्गम भागात विद्यार्थ्यांना दृकश्राव्य पद्धतीने कठीण विषद सोपा करून शिकविण्यासाठी मोबाईलच्या मदतीने अवघ्या दोनशे रुपयात अंजनगान सुर्जी येथील हरणे विद्यालयाच्या शिक्षकाने होलोग्राम थ्री डी प्रोजेक्टर बनविला आहे. माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची रुची वाढविण्याची संपूर्ण महाराष्ट्र डिजिटल क्लासरूम तयार करण्यावर भर दिला जात आहे. मात्र तीन लाख रुपये खर्चाचा महागडा प्रकल्प प्रत्येक शाळेद्वारा राबविणे शक्य नाही.
स्मार्ट मोबईलच्या मदतीने या होलोग्राम प्रोजेक्टद्वारा विद्यार्थ्यांना दृकश्राव्य.. पद्धतीने शिकविला येत आणि तेही केवळ २०० रुपये खर्च करून तयार केलेल्या डिजिटल प्रोजेक्टरद्वारे हे याचे वैशिष्ट्य म्हणता येईल. राज्याचे शिक्षण संचालक नामदेव जरग, विभागीय उपसंचालक सुरेश कुळकर्णी, शाळा निरीक्षक, मिलिंद राजगुरे, प्राचार्य आंबेडकर, सहायक अधीक्षक मिलिंद कुबडे, प्रमिला खरतमोल, रुपेश ठक्कर यांनी प्रोजेक्टर निर्मितीला प्रोत्साहन देऊन हे संशोधन इतत्रही नेण्यासाठी प्रोत्साहित केले. पंचफुलाबाई हरणे, जगन हरणे, प्राचार्य जयश्री कळमकर यांचा या संशोधनात मोलाचा हातभार लागला.
प्रोजेक्टरमध्ये या बाबींचा समावेश
या होलोग्राम प्रोजेक्टरमध्ये लाईट र्इंटरअिर पॅटर्न वापरण्यात आला आहे. एका लाकडी पेटीला बारीक छिद्र पाडून आणि पेटीच्या आत साध्या काचेच्या पट्ट्या विशिष्ट कोनात पिरॅमिड पद्धतीने बसवून हा प्रोजेक्टर तयार होतो आणि पडद्यावर किंवा भिंतीवर मोबाईलमधल्या उत्कृष्ट प्रतिमा दिसतात. याद्वारे क्लिष्ट विषयांना सोप्या पद्धतीने शिकविता ेयेते. विषय चित्राद्वारे उलगडून दाखविले जातात. यामुळे विद्यार्थ्यांना सहज अकलन होते.
राज्यस्तरावर निवड
संजय शेळके यांनी तयार केलेल्या या डिजिटल प्रोजेक्टरची निवड अमरावती विभागाने राज्यस्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या नाशिक येथे आयोजित केलेल्या शिक्षण परिषदेसाठी केली. सुमारे दोन हजार शिक्षकांच्या उपस्थितीत संजय शेळके यांनी तयार केलेल्या डिजिटल प्रोजेक्टरचे प्रात्यक्षिक दाखविले.